some foreign players are against of making rohit sharma as captain of mumbai indians amd2000 twitter
Sports

Rohit Sharma vs Hardik Pandya: रोहित पुन्हा बनणार मुंबईचा कर्णधार? मात्र या खेळाडूंकडून होतोय विरोध

Rohit Sharma Captaincy: आयपीएल २०२४ स्पर्धेची सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला. गेले १० संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवण्यात आली

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेची सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला. गेले १० संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवण्यात आली. मात्र त्याला ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडता आलेली नाही. मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. आता शेवटच्या सामन्यात विजय मिळवून मुंबईचा संघ गुणतालिकेत शेवटी राहणार नाही या प्रयत्नात असणार आहे.

हार्दिक पंड्याकडे संघाची जबाबदारी सोपवल्यापासून ड्रेसिंग रूमधलं वातावरण खराब झालं असल्याच्या चर्चा सुरू आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, आता मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा एकदा रोहितला कर्णधार बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर काही परदेशी खेळाडू हार्दिक पंड्याला समर्थन करताना दिसून येत आहेत.

दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार,मुंबई इंडियन्स संघात असलेले भारतीय खेळाडू रोहित शर्माला कर्णधार बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर परदेशी खेळाडूंना हार्दिक पंड्या कर्णधार म्हणून हवा आहे. मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा टीम डेव्हिडने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होतं. या वृत्तात असा देखील दावा करण्यात आला आहे की, संपूर्ण हंगामात रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या एकत्र सराव करण्यासाठी मैदानावर आलेच नाहीत. तर आणखी एका वृत्तात असं म्हटलं गेलं आहे की, ज्यावेळी हार्दिक पंड्या नेट्समध्ये फलंदाजीला आला, त्यावेळी सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा नेट्स सोडून निघून गेले.

आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ टी -२० वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेसाठी रोहित शर्माची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर हार्दिक पंड्याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र दोन्ही फलंदाज फॉर्ममध्ये नसल्याचं दिसून आलं आहे. हार्दिक पंड्याची बॅट पूर्ण हंगामात शांत राहिली. तर रोहित शर्माने पहिल्या हंगामात चांगली कामगिरी केली. मात्र दुसऱ्या हंगामात रोहितला हवी तशी कामगिरी करता आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर? भरसभेत मुख्यमंत्री,पंतप्रधानांचे गायले गोडवे

BMC Election : आगामी निवडणुकीत RPI महायुतीतून लढणार, पण...; रामदास आठवलेंनी सगळंच सांगितलं

₹23 Crore Bull Not Dead: 23 कोटींच्या 'अनमोल'चा मृत्यू? हट्टाकट्टा रेड्याला अचानक काय झालं?

SCROLL FOR NEXT