SL vs BAN Test Series Srilanka cricket team breaks the big record of team india  twitter
Sports

SL vs BAN Test Series: IPL सुरू असताना श्रीलंकेचा मोठा कारनामा! भारताचा 'महारेकॉर्ड' मोडला

Srilanka vs Bangladesh Test Series: भारतात सध्या आयपीएल २०२४ स्पर्धेचा थरार सुरू आहे. तर दुसरीकडे श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरू आहे.

Ankush Dhavre

Srilanka Cricket Team Breaks Team India Record:

भारतात सध्या आयपीएल २०२४ स्पर्धेचा थरार सुरू आहे. तर दुसरीकडे श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरू आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी श्रीलंकेने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५३१ धावा चोपल्या आहेत. मुख्य बाब म्हणजे धावफलकावर ५०० धावांचा आकडा असूनही श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाने शतक झळकावलं नाही. यासह श्रीलंकेने भारतीय संघाचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. यापूर्वी शतक न झळकवता सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा रेकॉर्ड हा भारतीय संघाच्या नावावर होता. (Cricket news in marathi)

भारतीय संघाने १९७६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात ९ गडी बाद ५२४ धावा केल्या होत्या. यादरम्यान एकाही भारतीय फलंदाजाने शतकी खेळी केली नव्हती. आता ५३१ धावा करत श्रीलंकेने हा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. आता शतक न झळकावता सर्वात मोठी धावसंख्या करण्याचा रेकॉर्ड हा श्रीलंकेच्या नावावर आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलंकेकडून एकाही फलंदाजाला शतकी खेळी करता आलेली नाही. मात्र ६ फलंदाजांनी अर्धशतक झळकावलं. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली. शतक पूर्ण करण्यासाठी केवळ ८ धावांची गरज असताना तो बाद होऊन माघारी परतला.

कसोटीत शतक न झळकावता मोठी धावसंख्या उभारणारे संघ..

श्रीलंका - ५३१ धावा

भारत - ५२४ धावा

ऑस्ट्रेलिया - ५२० धावा

दक्षिण आफ्रिका - ५१७ धावा

पाकिस्तान - ५०० धावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाहेर कॉम्प्यूटर सेंटरचं पोस्टर, आत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी तरूणींना रंगेहाथ पकडलं

Curd Water : दह्याला सुटलेले पाणी प्यावे की टाकून द्यावे? वाचा तज्ज्ञांचे मत

Weekly Horoscope : मिथुन, मीनसह ७ राशींना पूर्वजांचा आशीर्वाद; खुलणार करिअरचे दरवाजे; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Dark Chocolate Cake: वजन आणि हृदयासाठी फायदेशीर डार्क चॉकलेट केक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

India Tourism: खंडाळ्याला हमखास विसराल! वसईपासून ५ तासांच्या अंतरावर आहे 'हे' सुंदर पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT