CSK vs DC,IPL 2024: विजयानंतर दिल्लीला मोठा धक्का! रिषभ पंतची ही चूक पडली महागात

Rishabh Pant Fined: विशाखापट्टनममध्ये झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला आहे
big blow for csk rishabh pant fined by bcci for slow over rate during csk vs dc ipl 2024 match news in marathi amd2000
big blow for csk rishabh pant fined by bcci for slow over rate during csk vs dc ipl 2024 match news in marathi amd2000twitter
Published On

Rishabh Pant Fined By BCCI:

विशाखापट्टनममध्ये झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीच्या संघाने चेन्नईवर २० धावांनी विजय मिळवला आहे. हा सामना जिंकल्यानंतर रिषभ पंतला मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात त्याने मोठी चूक केली आहे.

रिषभ पंतवर या सामन्यात १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड स्लो ओव्हर रेटमुळे ठोठावण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना निर्धारित वेळेत षटकं टाकता आली नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ही पहिलीच चूक असल्याने त्याच्यावर १२ लाखांचा दंड ठोठावला गेला आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेत स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिलवर देखील १२ लाखांचा दंड ठोठावला गेला होता. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. (Cricket news in marathi)

big blow for csk rishabh pant fined by bcci for slow over rate during csk vs dc ipl 2024 match news in marathi amd2000
IPL 2024 GT vs SRH : मिलरची 'किलर' खेळी; गुजरात संघाचा ७ विकेट राखून विजय

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर ५ गडी बाद १९१ धावा केल्या. यादरम्यान डेव्हिड वॉर्नरने ५२ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने ३२ चेंडूत ५१ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला धावांचा पाठलाग करता आला नाही. चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने ४५ धावांची खेळी केली. तर आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या एमएस धोनीने १६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांचा मदतीने नाबाद ३७ धावा केल्या.

big blow for csk rishabh pant fined by bcci for slow over rate during csk vs dc ipl 2024 match news in marathi amd2000
IPL 2024 DC vs CSK : अखेरच्या क्षणी धोनीची फटकेबाजी व्यर्थ, दिल्ली कॅपिटल्सचा चेन्नई सुपर किंग्जवर २० धावांनी विजय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com