इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्स आणि शिखर धवनचा पंजाब किंग्स आमने-सामने आले. या सामन्यात पंजाब संघाने शेवटच्या षटकात ४ विकेट्स राखून विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा पराभव झाला तरी ऋषभ पंतच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांना चकीत केले. (Latest News)
तब्बल १५ महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतने बिबट्यासारखी चपळाईने स्टम्पिंग करत फलंदाजाला बाद केलं.पंतच्या शानदार स्टंपिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंजाब किंग्स संघाची फलंदाजी चालू असताना १२ व्या षटकाच्यावेळी ऋषभ पंतने शानदार स्टम्पिंग केली. पंतची स्टम्पिंग पाहून फलंदाजासह क्रिकेट चाहते आवाक झालेत. १२ वे षटक कुलदीप यादव टाकत होता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पंजाबचा फलंदाज जितेश शर्माने पुढे येत रिव्हर्स स्वीप फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूचा बॅटशी संपर्क झाला नाही. त्यानंतर फलंदाज शर्मा क्रीझवर पोहोचेपर्यंत ऋषभ पंतने स्टम्पिंग करत त्याला बाद केले. पापणी लपकेपर्यंत पंतने केलेली ही स्टम्पिंग पाहून अनेकजण आवाक झालेत. आयपीएलने त्याचा हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलाय.
जवळपास १५ महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणाऱ्या कर्णधार ऋषभ पंतला फलंदाजीत कमाल दाखवता आली नाही. ऋषभ पंत १८ धावा करून बाद झाला. या छोट्या खेळीत त्याने २ चौकार मारले. ऋषभ पंतला हर्षल पटेलने झेलबाद केले.
दिल्ली संघाचा पराभव
आयपीएल १७ व्या हंगामातील दुसरा सामना पंजाब किग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झाला. पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ८ विकेट गमावावून १७४ धावा केल्या. दिल्लीच्या संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने दमदार सुरुवात केली. जास्त विकेट न गमावता दिल्लीच्या संघाला मात दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.