इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात तिसरा सामना खेळला गेला. हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्समध्ये झाला. या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं.केकेआरकडून फलंदाजी करताना रिंकू सिंग आणि आंद्रे रसेलने फटकेबाजी केली. दोघांच्या फटकेबाजीने हैदराबादसमोर २०९ धावांचं आव्हान ठेवलं. (Latest News)
केकेआरने प्रथम फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये केकेआरची सुरुवात खराब राहिली. अवघ्या ३० धावांमध्ये ३ विकेट गमावले होत्या. परंतु मधल्या फळीमधील आणि खालच्या पातळीमधील फलंदाजांनी कमालीची फलंदाजी केली. १० षटकांचा खेळ संपला तेव्हा केकेआरच्या संघाने ७७ धावा केल्या होत्या. परंतु तोपर्यंत संघाने चार गडी गमावले होते.
साल्टने अर्धशतक करून आपला डाव संपवला. त्यानंतर मैदानात आलेल्या आंद्रे रसेलने रुद्र रुप धारण करत हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अवघ्या २५ धावांमध्ये त्याने ६४ धावा केल्या. त्याच्या या धमाकेदार खेळीने केकेआरचा संघाने २० षटकात ७ गडी गमावत २०८ धावांचं शिखर गाठलं.
केकेआरचा संघ
फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, मनीष पांडे, श्रीकर भारत, मुजीब उर रहमान, अनुकुल रॉय, रहमानउल्ला गुरबाज, चेतन साकारिया, शेरफान रदरफोर्ड, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, अंगक्रिश रघुवंशी, साकिब हुसेन, सुयश शर्मा.
सनरायझर्स हैदराबादचा संघ
मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, जयदेव उनाडकट, अनमोलप्रीत सिंग , उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, जाटवेध सुब्रमण्यम, सनवीर सिंग, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, शाहबाज अहमद, आकाश महाराज सिंग, नितीश रेड्डी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.