MS Dhoni Record: IPL मध्ये धोनीचा महारेकॉर्ड! 'शतक' पूर्ण करत रचला इतिहास

MS Dhoni Record In IPL: या सामन्यात एमएस धोनीच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. काय आहे तो रेकॉर्ड जाणून घ्या.
CSK vs DC IPL 2024 ms dhoni completed 100 sixes in 19th and 20th over in ipl history
CSK vs DC IPL 2024 ms dhoni completed 100 sixes in 19th and 20th over in ipl historytwitter

CSK vs DC IPL 2024, MS Dhoni Record:

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात एमएस धोनीला पहिल्यांदाच फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. शेवटी त्याने आक्रमक फटकेबाजी केली, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आव्हान मोठं असताना धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यानंतर त्याने चौकार - षटकार खेचत चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्याने २३१.२५ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत १६ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे.

एमएस धोनी आपल्या फिनिशिंग स्टाईलसाठी ओळखला जातो. शेवटच्या षटकांमध्ये येऊन तो आक्रमक खेळ करून संघाला विजय मिळवून देतो. या सामन्यादरम्यान त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आयपीएल स्पर्धेतील १९ व्या आणि २० व्या षटकात फलंदाजी करताना १०० षटकार पूर्ण केले आहेत.

CSK vs DC IPL 2024 ms dhoni completed 100 sixes in 19th and 20th over in ipl history
CSK vs DC,IPL 2024: विजयानंतर दिल्लीला मोठा धक्का! रिषभ पंतची ही चूक पडली महागात

असा कारनामा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा कुठल्याच फलंदाजाला करता आला नव्हता. वेस्टइंडीजचा दिग्गज फलंदाज कायरन पोलार्ड या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. पोलार्डने १९ व्या आणि २० व्या षटकात फलंदाजी करताना ५७ षटकार मारले आहेत. एमएस धोनी या यादीत ४३ षटकारांनी आघाडीवर आहे.

CSK vs DC IPL 2024 ms dhoni completed 100 sixes in 19th and 20th over in ipl history
IPL 2024 DC vs CSK : अखेरच्या क्षणी धोनीची फटकेबाजी व्यर्थ, दिल्ली कॅपिटल्सचा चेन्नई सुपर किंग्जवर २० धावांनी विजय

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज (१९ व्या आणि २० व्या षटकात)

१) एमएस धोनी - १०० षटकार

२) कायरन पोलार्ड - ५७ षटकार

३) एबी डीव्हीलियर्स - ५५ षटकार

४) हार्दिक पंड्या - ५५ षटकार

५) आंद्रे रसल - ५१ षटकार

६) रविंद्र जडेजा - ४६ षटकार

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नईला हरवत दिल्लीने आपलं विजयाचं खातं उघडलं आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजयासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईला २० षटकअखेर १७१ धावा करता आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com