आयपीएल २०२४ स्पर्धेच्या एक दिवसापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाने मोठा बॉम्ब फोडला आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व करणाऱ्या एमएस धोनीने कर्णधारपदावरुन माघार घेतली आहे. तर ही जबाबदारी मराठमोळा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान या निर्णयानंतर अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, आगामी हंगामात धोनी खेळणार की नाही? जाणून घ्या.
आयपीएल स्पर्धेला २००८ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून एमएस धोनी हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व करतोय. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर अशी चर्चा सुरु होती की, तो आयपीएलला देखील रामराम करेल. मात्र त्यानंतरही त्याने ३ वर्ष संघाचं नेतृत्व करेल. आगामी हंगाम सुरु होण्यापूर्वी त्याने कर्णधारपद सोडलं आहे. मात्र चाहत्यांसाठी गुड न्यूज अशी की, तो यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना दिसून येणार आहे.
ऋतुराज गायकवाडकडे भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा खेळाडूंच्या भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. हे धोनीचं शेवटचं हंगाम असू शकतं. त्यामुळे चेन्नईचा संघ नव्या कर्णधाराच्या शोधात होता. ऋतुराज गायकवाड हा उत्कृष्ट फलंदाज असून उत्तम कर्णधार देखील आहे. त्यामुळे धोनीच्या मार्गदर्शनाखाली तो नेतृत्वाचे धडे गिरवू शकतो. (Cricket news in marathi)
चेन्नईचा भविष्यातील कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडकडे पाहिलं जात होतं. त्यामुळेच त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवली गेली आहे. यापूर्वी २०२२ मध्ये धोनीने कर्णधारपदावरुन माघार घेत रविंद्र जडेजाकडे ही जबाबदारी सोपवली होती. मात्र त्याला ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडता आली नव्हती. त्यामुळे धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपदाचा कार्यभार स्विकारला. त्यानंतर २०२३ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने जेतेपदावर नाव कोरलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.