MS Dhoni Captaincy: MS धोनीने सोडलं सीएसकेचं कर्णधारपद; काय म्हणाले CSK CEO कासी विश्वनाथन?

MS Dhoni Captaincy : एमएस धोनीने कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियाचा पाऊस पडू लागलाय.धोनीने तडकाफडकी निर्णय घेतल्यानंतर सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांची प्रतिक्रिया समोर आलीय.
MS Dhoni Captaincy
MS Dhoni CaptaincySaam Tv
Published On

CSK CEO Kasi Viswanathan On MS Dhoni Captaincy:

आयपीएलमध्ये 'थाला' म्हणून नावलौकिक मिळवलेल्या एमएस धोनीने आज सीएसकेचं कर्णधारपद सोडलं. एमएस धोनीच्या जागी सीएसकेच्या संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय संघ व्यवस्थापकांबरोबर होणाऱ्या बैठकीच्या आधीच जाहीर केला.(Latest News)

उद्या चेन्नई (Chennai) संघाचा सामना बेंगळुरूसोबत होणार आहे,त्याचपूर्वी धोनी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण इतक्या तडकाफडकी निर्णय घेण्यामागे काय कारण आहे, त्यावरून तर्क-वितर्क काढले जात आहेत. त्याचदरम्यान सीएसकेचे सीईओ यांची प्रतिक्रिया समोर आलीय. धोनीने कर्णधार पद का सोडलं यामागील कारण त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.

एमएस धोनीने कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियाचा पाऊस पडू लागलाय.धोनीने तडकाफडकी निर्णय घेतल्यानंतर सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांची प्रतिक्रिया समोर आलीय. धोनीने घेतलेला निर्णय संघाच्या भल्यासाठी घेतल्याचं विश्वनाथन आपल्या प्रतिक्रियेत म्हणालेत. दरम्यान धोनी कर्णधारपद सोडणार असल्याची कल्पना एकालाही नव्हती. एमएस धोनीने त्याच्या ट्रेडमार्क शैलीत कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

एमएस धोनीने आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे. ऋतुराज २०१९ पासून चेन्नई सुपर किंग्जचा अविभाज्य भाग आहे. त्याने या काळात आयपीएलमध्ये ५२ सामने खेळलेत. संघ आगामी हंगामासाठी उत्सुक आहे, ”असं सीएसकेने अधिकृत विधान धोनीच्या निर्णयानंतर जाहीर केले आहे.

धोनी संघाचे नेतृत्व सोडणार आहे हे मला माहित नव्हते.असा खुलासा सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी केलाय. धोनी जे काही करतो ते संघाच्या हिताचं असतं. मला कर्णधारपद सोडण्याचा त्याचा निर्णय बैठकीपूर्वी कळाला. तुम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, हा त्यांचा कॉल आहे,” असे सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी पीटीआय या माध्यमाला सांगितले.

दरम्यान सीएसकेने २०२२ च्या आयपीएल हंगामात देखील संघाचं नेतृत्व दुसऱ्याकडे देण्याचा प्रयत्न केला होता. त्या सत्रात संघाचे नेतृत्व रवींद्र जडेजाकडे देण्यात आले होते. त्यावेळी ८ सामन्यांनंतर जडेजाने परत धोनीकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवले होते.

MS Dhoni Captaincy
IPL 2024: धोनी फटकेबाजी करण्यास तयार; ब्राव्होला मारलेला षटकार पाहून आरसीबीला फुटेल घाम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com