बांग्लादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा संघ मजबूत स्थितीत आहे. श्रीलंकेच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी करत ५१० धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात श्रीलंकेने २८० धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संपूर्ण संघ १८८ धावांवर आटोपला. यासह श्रीलंकेने ९२ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने ४१८ धावांचा डोंगर उभारला. दरम्यान हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेने बांग्लादेश संघासमोर ५११ धावांचे आव्हान ठेवले आहे.
या डावात श्रीलंकेकडून कामिंदु मेंडिसने १६४ धावांची खेळी केली. यासह कर्णधार धनंजय डी सिल्वाने १०८ धावांची खेळी केली. ही शतकी खेळी दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या डावात केली. योगायोग असा की, या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या डावात देखील शतक झळकावलं होतं. पहिल्या डावात फलंदाजी करताना कामिंदु आणि धनंजयने १०२-१०२ धावांची खेळी केली होती. या शतकी खेळीसह दोघांच्या नावे अनेक मोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं..
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाने दोन्ही डावात शतक झळकावलं आहे. या सामन्यातील पहिल्या डावात कामिंदुने सातव्या क्रमांकावर खेळताना आणि दुसऱ्या डावात आठव्या क्रमांकावर खेळताना शतक साजरं केलं आहे. एकाच सामन्यात २ शतक झळकावत त्याने इतिहास रचला आहे. (Cricket news in marathi)
या रेकॉर्डची देखील झाली नोंद...
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पाचव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांनी दोन्ही डावात शतकं झळकावली आहेत. यापूर्वी १९७४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या इयान चॅपल आणि ग्रेग चॅपल यांनी यांनी दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. त्यानंतर २०१४ मध्ये पाकिस्तान संघातील फलंदाज अजहर अली आणि मिस्बाह उल हक यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील दोन्ही डावात शतकं झळकावली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.