shubman gill needs 27 runs to complete 3000 runs in ipl career amd2000 twitter
Sports

Shubman Gill Record: शुभमन गिलकडे इतिहास रचण्याची संधी! असा रेकॉर्ड करणारा ठरणार दुसराच भारतीय फलंदाज

RR vs GT, IPL 2024: राजस्थानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात शुभमन गिलला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Shubman Gill Fastest 3000 Runs In IPL :

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२४ स्पर्धेतील २४ वा सामना रंगणार आहे. हा सामना जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत सर्व सामने जिंकले आहेत.

तर दुसरीकडे गुजरात टायटन्स संघाला गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सचा संघ या सामन्यातून कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलकडे एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

मोठा रेकॉर्ड करण्याची संधी...

शुभमन गिलने २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं होतं. ४ वर्ष या संघाकडून खेळल्यानंतर २०२२ मध्ये त्याला गुजरात टायटन्स संघाने आपल्या संघात घेतलं. सध्या तो गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करतोय. त्याचा या स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला, तर त्याने ९६ सामन्यातील ९३ डावात त्याने २९७३ धावा केल्या आहेत.

त्याला आयपीएल स्पर्धेत ३००० धावा पूर्ण करण्यासाठी केवळ २७ धावांची गरज आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याने या २७ धावा केल्या. तर त्याच्याकडे डेव्हिड वॉर्नरच्या रेकॉर्डच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे. डेव्हिड वॉर्नरने देखील ९४ व्या डावात ३००० धावा पूर्ण केल्या होत्या.

हा रेकॉर्ड करत त्याला सर्वात जलद ३००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. या स्पर्धेत सर्वात जलद ३००० धावा करण्याचा रेकॉर्ड हा वेस्टइंडियचा माजी फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलने हा कारनामा अवघ्या ७५ व्या डावात केला होता. तर दुसऱ्या स्थानी केएल राहुल आहे. त्याने हा रेकॉर्ड ८० व्या डावात केला होता. केएल राहुल हा या स्पर्धेत सर्वात जलद ३००० धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज आहे.

हे आहेत आयपीएल स्पर्धेत सर्वात जलद ३००० धावा करणारे फलंदाज...

ख्रिस गेल - ७५

केएल राहुल - ८०

डेव्हिड वॉर्नर - ९४

सुरेश रैना - १०३

एबी डिव्हिलियर्स - १०४

अजिंक्य रहाणे - १०४

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttar Pradesh Heartbreaking : शाळेचा पहिला दिवस, कारमधून उतरला अन् धाडकन जमिनीवर कोसळला; १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Maharashtra Live News Update: नांदेड शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

SCROLL FOR NEXT