Manasvi Choudhary
अस्सल गावरान पद्धतीचा चिकनचा रस्सा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सहजरित्या ही रेसिपी बनवू शकता.
चिकन रस्सा बनवण्यासाठी चिकन, कांदे, सुकं खोबरे, आले- लसूण पेस्ट, मसाला, हळद, मीठ, कोथिंबीर, हे साहित्य एकत्र करा.
चिकन रस्सा बनवण्यासाठी सर्वातआधी चिकन स्वच्छ धुवून घ्या. त्यात हळद, मीठ आणि आले- लसूण पेस्ट लावून ठेवा.
गॅसवर तव्यावर बारीक चिरलेला कांदा काळा होईपर्यत भाजून घ्या सुकं खोबरे भाजून घ्या. हे दोन्ही थंड करा आणि यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करा.
एका पातेल्यात गरम तेलामध्ये तयार वाटण मिक्स करा नंतर यात लाल मसाला घालून मिश्रण एकजीव करा.
नंतर या मिश्रणात मॅरिनेट केलेले चिकन मिक्स करून परतून घ्या आवश्यकतेनुसार या मिश्रणात गरम पाणी घाला भाजीवर झाकण लावा आणि शिजवून घ्या.