Manasvi Choudhary
हॉटेल असो किंवा घरी जेवणाच्या थाळीमध्ये लिंबू तुम्ही पाहिलाच असेल. जेवणात लिंबू पिळून खाण्याचे नेमके फायदे काय आहेत हे जाणून घेऊया.
फार पूर्वीपासून जेवणात लिंबू पिळून खाल्ले जाते यामागे केवळ चवच नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे मानले जाते.
लिंबामधील सायट्रिक ॲसिड असते ज्यामुळे अन्नाचे पचन सुरळीत होण्यास मदत होते.
नॉन व्हेज जेवण केल्याने शरीर जड होते मात्र कांदा आणि लिंबू खाल्ल्याने जडपणा कमी होतो.
जेवणात लिंबू पिळल्याने पाचक रसांचे स्त्राव वाढवते, ज्यामुळे गॅस आणि अपचनाचा त्रास कमी होतो.
तिखट आणि तेलकट पदार्थांमधील चवीचा समतोल राखण्यासाठी चव येण्यासाठी लिंबू वापरले जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.