IPL 2024: किंग कोहलीचा Orange Cap वर कब्जा! Purple Cap कुणाच्या डोक्यावर?

IPL 2024 Purple Cap List: चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना झाल्यानंतर अशी आहे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपची यादी.
IPL 2024: किंग कोहलीचा Orange Cap वर कब्जा! Purple Cap कुणाच्या डोक्यावर?
IPL 2024 orange cap and purple cap list after csk vs kkr match amd2000yandex
Published On

IPL 2024, Orange Cap And Purple Cap List:

आयपीएल २०२४ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात जे संघ पिछाडीवर आहेत, ते संघ कमबॅक करताना दिसून येऊ शकतात. या स्पर्धेत फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. तर गोलंदाजांनीही शानदार कामगिरी केली आहे. दरम्यान ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या यादीत कोण आहे अव्वल स्थानी? जाणून घ्या.

आयपीएल २०२४ स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज..

विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु) - ३१६ धावा

साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) - १९१ धावा

रियान पराग (राजस्थान रॉयल्स) - १८५ धावा

शुभमन गिल (गुजरात टायटन्स) - १८३ धावा

संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स)- १७८ धावा

IPL 2024: किंग कोहलीचा Orange Cap वर कब्जा! Purple Cap कुणाच्या डोक्यावर?
IPL 2024, PBKS Vs SRH: पंजाब किंग्स हैदराबादला देणार का मात? दोन्ही संघात कोण राहिलंय वरचढ?

आयपीएल २०२४ स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज..

मुस्तफिजुर रहमान (चेन्नई सुपर किंग्ज) - ९ गडी

युजवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स) - ८ गडी

गेराल्ड कोएत्जी (मुंबई इंडियन्स) - ७ गडी

मोहित शर्मा (गुजरात टायटन्स)- ७ गडी

खलील अहमद ( दिल्ली कॅपिटल्स) - ७ गडी

IPL 2024: किंग कोहलीचा Orange Cap वर कब्जा! Purple Cap कुणाच्या डोक्यावर?
IPL 2024 Points Table: चेन्नईच्या विजयानंतर गुणतालिकेचं समीकरण बदललं! तुमचा आवडता संघ कितव्या स्थानी?

मुस्तफिजुर रहमानने पटकावली पर्पल कॅप..

आयपीएल २०२४ स्पर्धेत सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स असा सामना रंगला. या सामन्यात गोलंदाजी करताना रविंद्र जडेजा, तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान यांनी शानदार गोलंदाजी केली. चेन्नईकडून जडेजा आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर मुस्तफिजुर रहमानने २ गडी बाद केले. हे २ गडी बाद करताच त्याने पर्पल कॅपवर कब्जा केला. या शानदार गोलंदाजीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्स संघाला २० षटकअखेर अवघ्या १३८ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने ७ गडी ऱाखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com