CSK VS KKR: मैदानात आला, पुन्हा माघारी फिरला, जडेजाने धोनीच्या चाहत्यांना गंडवलं; VIDEO व्हायरल!

Ravindra Jadeja Viral Video: कोलकात्ताविरुद्धच्या सामन्यातही असेच चित्र पाहायला मिळाले. मात्र कालच्या सामन्यात धोनीची मैदानावर एन्ट्री होण्याआधी रविंद्र जडेजाने केलेल्या खोडसाळपणाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Ravindra Jadeja Viral Video:
Ravindra Jadeja Viral Video:Saamtv

CSK Vs KKR VIDEO:

सध्या क्रिकेटच्या मैदानात आयपीएलचा रणसंग्राम सुरू आहे. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात चर्चा होते ती चेन्नईचा किंग महेंद्रसिंग धोनी अन् त्याच्या जबरा चाहत्यांची. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चेन्नईचे चाहते उत्सुक असतात.

धोनी मैदानावर येण्याची ते वाट पाहत असतात. काल कोलकात्ताविरुद्धच्या सामन्यातही असेच चित्र पाहायला मिळाले. मात्र कालच्या सामन्यात धोनीची मैदानावर एन्ट्री होण्याआधी रविंद्र जडेजाने केलेल्या खोडसाळपणाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

घडलं असं की चेन्नईचा फलंदाज शिवम दुबेची विकेट पडल्यानंतर मैदानावर कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची एन्ट्री होणार होती. मात्र महेंद्रसिंग धोनीच्या एन्ट्रीआधी रविंद्र जडेजाने चाहत्यांची फिरकी घेण्याचा विचार केला. माहीचे चाहते त्याच्या एन्ट्रीची वाट पाहत होते, धोनीही येणार होता. त्याआधी जडेजाने गंमत करत मैदानावर पॅड बांधत एन्ट्री केली.

जडेजा पॅड बांधून बॅट हाती घेऊन मैदानाच्या दिशेने येताना दिसताच चाहत्यांचा आवाज काही सेकंद थांबला. अशातच जडेजा लगेच माघारी फिरला अन् धोनीची (Mahendra Singh Dhoni) मैदानात एन्ट्री झाली. त्यानंतर पुन्हा एकदा माहीच्या चाहत्यांनी एकच गोंधळ केला.

Ravindra Jadeja Viral Video:
IPL 2024, PBKS Vs SRH: पंजाब किंग्स हैदराबादला देणार का मात? दोन्ही संघात कोण राहिलंय वरचढ?

मैदानामध्ये लाडक्या धोनीची एन्ट्री होताच चाहत्यांनी प्रचंड आरडा ओरडा करत आनंद व्यक्त केला. हा गोंधळ इतका होता की केकेआरचा खेळाडू आंद्रे रसेलला अक्षरशः आपले कान पकडावे लागले. हा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ravindra Jadeja Viral Video:
Uddhav Thackeray : वंचित आणि महाविकास आघाडीच्या युतीची शक्यता संपली; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com