आयपीएल २०२४ मधील २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत केकेआरला मोठी खेळी करण्यापासून रोखलं. चेन्नईने केकेआरचं आव्हान सात विकेट राखत पार केले. क्षेत्ररक्षणावेळी जडेजाने एक भन्नाट झेल घेतला. जडेजाने घेतलेल्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest IPL News)
या सामन्यात दीपक चहरच्या जागेवर तुषार देशपांडे सीएसकेकडून खेळला. तुषार देशपांडेने सीएसकेसाठी पहिले षटक टाकत पहिल्याच चेंडूवर यश मिळवून दिले. तुषारच्या चेंडूवर रविंद्र जडेजाने फिल सॉल्टचा अप्रतिम झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होतोय. दरम्यान सॉल्ट शून्यावर बाद झाल्याने त्यांच्या नावावर नकोसा विक्रम झालाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या सामन्यात खाते न उघडताच बाद झाल्यानंतर आयपीएलमध्ये फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेलाय. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केकेआरचे ४ फलंदाज सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झालेत. यापूर्वी जॅक कॅलिस आणि तीन फलंदाजही आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर बाद झाले.
ब्रेंडन मॅक्क्युलम आरसीबी विरुद्ध , २००९
मनोज तिवारी डेक्कन विरुद्ध , २०१०
जॅक कॅलिस दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २०१४
जे डेन्ली दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २०१९
फिल सॉल्ट सीएसकेविरुद्ध २०२४
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाता संघाचा खेळ खराब झाला. केकेआरच्या संघाने २० षटकात ९ विकेट गमावत १३७ धावा केल्या. हे आव्हान सीएसकेच्या संघाने १७.४ षटकात ३ विकेट गमावत पार केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.