भारतीय संघाने वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियावर जोरदार विजय मिळवला आहे. या सामन्यापू्र्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. तुफान फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आजारी असल्यामुळे पहिल्या सामन्यातून बाहेर झाला होता.
भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानविरूद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. या सामन्यापूर्वी शुबमन गिलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरूद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. आता दुसरा सामना येत्या ११ ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरूद्ध रंगणार आहे. या सामन्यातही शुबमन गिल खेळणार नसल्याची अपडेट बीसीसीआयने दिली आहे.
बीसीसीआयने शुबमन गिलच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. शुबमन गिल अजुनही चेन्नईच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली आहे. तो संघासोबत दिल्लीला रवाना झालेला नाही. त्यामुळे तो अफगाणिस्तान संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसून येणार नाही.
हा सामना झाल्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी भारतीय संघ पाकिस्तानविरूद्ध दोन हात करणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यातही शुबमन गिल खेळताना दिसण्याची शक्यता खुप कमी आहे. (Latest sports updates)
गिलऐवजी ईशान किशनला मिळणार संधी..
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यापूर्वी ६ ऑक्टोबर रोजी शुबमन गिलची डेंग्यूची चाचणी पॉझिटीव्ह आली होती. या सामन्यात शुबमन गिलऐवजी ईशान किशनला संधी दिली गेली होती. या सामन्यात त्याला खातं ही उघडता आलं नव्हतं. अफगाणिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यातही ईशान किशनला डावाची सुरूवात करण्याची संधी दिली जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.