Manasvi Choudhary
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला.
या सामन्यात चेज मास्टर किंग कोहलीने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
विराट कोहलीने वनडेत धावांचा यशस्वी पाठलाग करताना ५५१७ धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो सर्वाधिक धावा करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.
सचिन तेंडुलकरने वनडेत धावांचा यशस्वी पाठलाग करताना ५४९० धावा केल्या आहेत.
रिकी पॉन्टिंगने वनडेत धावांचा यशस्वी पाठलाग करताना ४१८६ धावा केल्या आहेत
रोहित शर्माने वनडेत धावांचा यशस्वी पाठलाग करताना ३९८३ धावा केल्या आहेत.