Sachin Tendulkar Tweet: IND vs AUS सामन्याच्या सुरुवातीलाच सचिनला बसला होता आश्चर्याचा धक्का! थरारक विजयानंतर केलेलं ट्वीट व्हायरल

India vs Australia, World Cup 2023: भारतीय संघाच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरचं एक ट्वीट सध्या जोरदार चर्चेत आहे.
sachin tendulkar tweet
sachin tendulkar tweettwitter
Published On

Sachin Tendulkar Tweet:

भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला जोरदार प्रारंभ केला आहे. पहिल्याच सामन्यात यजमान भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवला आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०० धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५२ चेंडू शिल्लक ठेऊन आव्हान पूर्ण केलं. दरम्यान या विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागलं आहे.

सचिनचं ट्वीट होतंय व्हायरल...

या सामन्यानंतर सचिन तेंडुलकरने ट्वीट करत लिहिले की, 'भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. या दमदार कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा डाव १९९ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने देखील चांगली सुरूवात केली. मात्र ऑस्ट्रेलिाय संघात डाव्या हाताच्या गोलंदाजाची कमतरता जाणवली. विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांमध्ये अप्रतिम भागीदारी पाहायला मिळाली. याच खेळीच्या जोरावर भारतीय संघाने हा सामना जिंकला. दुसऱ्या डावात चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क होत होता. हा शानदार विजय मिळवल्यामुळे भारतीय संघाचं अभिनंदन.' (Latest sports updates)

या कारणामूळे सचिन झाला आश्चर्यचकीत..

सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या एका निर्णयामुळे आश्चर्यकचकीत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सचिनने आपल्या ट्वीटमध्ये लिहीले की,'मला आश्चर्य वाटलं की,नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात नाणेफेक जिंकताच ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

sachin tendulkar tweet
India vs Australia Match: 0, 0, 0.... ऑस्ट्रेलियन गोलंदाजासमोर शेर झाले ढेर; टीम इंडियाची खराब सुरूवात

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा डाव अवघ्या १९९ धावांवर संपुष्टात आला होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून विराट कोहलीने ८५ तर केएल राहुलने नाबाद ९७ धावांची खेळी करून संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com