India vs Australia Match: 0, 0, 0.... ऑस्ट्रेलियन गोलंदाजासमोर शेर झाले ढेर; टीम इंडियाची खराब सुरूवात

India vs Australia Match: दिग्गज फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने टीम इंडिया अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.
India vs Australia Match
India vs Australia Match ICC Twitter
Published On

India vs Australia Match:

विश्वचषकात आज रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांचा सहावा सामना चेन्नईतील चेपॉक मैदानावर सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात ऑस्ट्रेलियाला दोनशे पार धावा देखील करत्या आल्या नाही. ऑस्ट्रेलियाने दिलेलं अवघ्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच तीन मोठे धक्के बसले आहेत.

भारताचे तीन दिग्गज फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहेत. दिग्गज फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने टीम इंडिया अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. (Latest Marathi News)

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २०० धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची खराब सुरुवात झाली आहे. मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकामध्ये ईशान किशनला झेलबाद केले. तर दुसऱ्या षटकात जोश हेझलवूडने कर्णधार रोहित शर्माला बाद केले.

रोहित शर्मानंतर श्रेयस अय्यर देखील शून्यावर बाद झाला. भारताचे पहिल्या फळीचे दिग्गज फलंदाज बाद झाल्याने आता सर्व मदार ही मधल्या फळीवर असणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलिया संघ अवघ्या १९९ धावांवर गारद झाला. विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना १२ वेळा झाला आहे. या १२ सामन्यापैकी टीम इंडिया ४ वेळा जिंकली आहे. तर टीम ऑस्ट्रेलिया ८ वेळा जिंकली आहे.

India vs Australia Match
Kasara Ghat Accident: आधी ट्रकने कारला, नंतर बसने ट्रकला दिली धडक; कसारा घाटात विचित्र अपघात

चेपॉकवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा रेकॉर्ड कसा आहे?

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात चेपॉकच्या मैदानावर २३ सामने खेळले गेले आहेत. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १४ सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ८ सामने जिंकल्याची नोंद आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com