Kasara Ghat Accident: आधी ट्रकने कारला, नंतर बसने ट्रकला दिली धडक; कसारा घाटात विचित्र अपघात

Shahapur Accident News: आधी ट्रकने कारला, नंतर बसने ट्रकला दिली धडक; कसारा घाटात विचित्र अपघात
Kasara Ghat Accident
Kasara Ghat AccidentSaam Tv
Published On

>> फय्याज शेख

Kasara Ghat Accident News:

कसारा घाटात एक विचित्र अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. नाशिक - मुंबई लेनवरील कसारा घाटात बससह अन्य 3 गाड्यांचा हा अपघात झाला आहे. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाल्याचं सांगण्यात यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी कसारा घाटात एक कारला ट्रकने धडक दिली. हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी असलेल्या लोकांनी या अपघातातील जखमींना गाडीतून बाहेर काढलं आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं.

Kasara Ghat Accident
Aslam Shaikh News: 'दोन दिवसांत उडवणार', माजी मंत्री अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी

जखमींना सुक्षित ठिकाणी पोहोचवलं असता यावेळी एका भरधाव बसने ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत कारसह बसचे मोठे नुकसान झाले आहे. या विचित्र अपघानंतर तिथे भीतीचं वातावरण पसरल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी काही मिनिटातच आपत्ती व्यवस्थापन् टीम आणि पोलीस पोहोचले असल्याचं सांगण्यात येत आहे.

Kasara Ghat Accident
Cheapest Electric Scooters: एका चार्जमध्ये संपूर्ण मुंबई फिरता येईल, जबरदस्त आहे ही इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत फक्त 32500 रुपये

दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला, यात नेमकी चूक कोणाची होती? याबाबत सविस्तर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. तसेच अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com