Shreyas Iyer X (Twitter)
Sports

Shreyas Iyer : जे KKR नं गमावलं, ते पंजाबनं कमावलं; 5 चौकार, 9 षटकारांसह कॅप्टन अय्यरची वादळी खेळी

GT Vs PBKS Live Match : कोलकाता नाईट रायडर्सने रिटेन न केलेल्या श्रेयस अय्यरला पंजाबने संघात सामील केले. त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. कर्णधारपद दिल्यानंतर पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यरने तुफानी खेळ केला.

Yash Shirke

Shreyas Iyer GT Vs PBKS Live : गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स हा आयपीएल २०२५ मधला सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये पंजाबने प्रथम फलंदाजी केली. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला. प्रभसिमरन सिंह बाद झाल्यानंतर अय्यर मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी आला. फटाफट शॉर्ट मारत त्याने ४२ बॉल्समध्ये नाबाद ९७ धावा केल्या. त्याचे शतक फक्त ३ धावांनी हुकले. या खेळीत अय्यरने ५ चौकार आणि ९ षटकार मारले.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पंजाब किंग्सच्या सलामीवीरांनी डावाची सुरुवात केली. प्रियांश आर्यने शानदार फटके लगावत ४७ धावा केल्या, तर प्रभसिमरन सिंह स्वस्तात बाद झाला.

प्रभसिमरनची विकेट पडल्यानंतर श्रेयस अय्यर मैदानामध्ये उतरला. प्रियांशच्या विकेटनंतर श्रेयस अय्यर आणि अझमतुल्ला उमरझाई यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पुढे उमरजाई आणि मॅक्सवेल एकाच ओव्हरमध्ये बाद झाले. पुढे मार्कस स्टोइनिस २० धावा करुन परतला. शशांक सिंहच्या साथीने श्रेयस अय्यरने धावसंख्या २०० पार नेल्या. पंजाबच्या खेळाडूंनी २४३ धावा केल्या आहेत.

गुजरातची प्लेईंग ११ -

शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

पंजाबची प्लेईंग ११ -

प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अझमतुल्ला उमरझाई, मार्को जानसेन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: इंटरव्ह्यूआधी वडिलांचे निधन, आभाळाएवढं दुःख तरी मानली नाही हार; शुभम राय यांनी ६व्या प्रयत्नात क्रॅक केली MPPSC

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

SCROLL FOR NEXT