
Glenn Maxwell : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फलंदाजी करण्यासाठी पंजाबचे सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये उतरले.
सलामीवर प्रियांश आर्यने दमदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. तर प्रभसिमरन सिंह स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर-अझमतुल्ला उमरझाई खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. दहाव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर उमरजाई कॅचआउट झाला आणि मॅक्सवेल फलंदाजीसाठी आला. पहिल्याच बॉलवर ग्लेन मॅक्सवेल एलबीडब्लू आउट झाला.
नेमकं काय घडलं?
साई किशन दहाव्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर अझमतुल्ला उमरझाई बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या ग्लेन मॅक्सवेलसमोर साई किशनने बॉल टाकला. त्यावर साई किशोर आणि गुजरातच्या खेळाडूंनी अपील केले. अंपायरनी मॅक्सवेल बाद झाल्याचे घोषित केले.
अंपायर्सनी मॅक्सवेल आउट झाल्याचे सांगितल्यानंतर मॅक्सवेल आणि नॉन स्ट्राईकला असलेल्या कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यात चर्चा झाली. श्रेयसने तो बाद असल्याचे म्हणत रिव्ह्यू घेतला नाही. पुढे रिव्ह्यू समोर आला. त्यात मॅक्सवेल बाद नव्हता हे सिद्ध झाले. अय्यरने डीआरएस न घेतल्याने मॅक्सवेल भोपळा न फोडता शून्यावर बाद होऊन माघारी परतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.