Shreyas Iyer admitted in Hospital saam tv
Sports

Shreyas Iyer in ICU: मोठी बातमी! श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, इंटरनल ब्लिडिंगमुळे ICU मध्ये उपचार सुरू

Shreyas Iyer admitted in Hospital: शनिवारी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरा वनडे सामना खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान कॅच पकडताना टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली होती.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियामधून एक मोठी बातमी समोर येतेय. भारतीय वनडे टीमचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला सिडनीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला ICU मध्ये ठेवण्यात आलं आहे. इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळे सध्या श्रेयस अय्यरवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

तपासणीत त्याला internal bleeding झाल्याचं आढळलं. डॉक्टरांच्या माहितीनुसार, श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे, पण भारतात परतण्यापूर्वी त्याला किमान एक आठवडा रुग्णालयात राहावं लागणार आहे.

अय्यर कशी झाली दुखापत?

सिडनी वनडे दरम्यान श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाच्या विकेटकीपर अ‍ॅलेक्स कॅरीचा उत्तम कॅच घेतला. हा झेल त्याने बॅकवर्ड पॉइंटवरून मागे धावत जाऊन टिपला. मात्र कॅच घेताना तो खाली पडला आणि त्याला मार बसला.

फील्डिंग संपवून ज्यावेळी तो ड्रेसिंग रूममध्ये परतला, तेव्हा त्याच्या वेदना वाढला आणि त्याला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. यावेळी त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तपासणीनंतर इंटरनल ब्लिडींग असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यामुळे आयसीयूमध्ये दाखल केलंय.

एका सूत्राने पीटीआयला सांगितलं की, “श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. त्याला २ ते ७ दिवसांपर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. रक्तस्रावामुळे इन्फेक्शनचा धोका असल्याने ही काळजी घेणं आवश्यक आहे. टीमचे डॉक्टर आणि फिजिओ यांनी कोणताही धोका न पत्करता त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. सध्या स्थिती स्थिर आहे पण ही परिस्थिती घातक ठरू शकली असती.”

मैदानावर कधी करणार कमबॅक?

सूत्रांच्या माहितीनुसार, “श्रेयस एक चांगला खेळाडू आहे आणि तो लवकरच बरा होईल. मात्र इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळे त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे. सध्या त्याचं कमबॅक कधी होईल हे सांगता येणं निश्तित नाही.”

पूर्वी श्रेयस अय्यर सुमारे तीन आठवडे क्रिकेटपासून दूर राहील, असा अंदाज होता. पण आता त्याच्या रिकव्हरीचा कालावधी थोडा अधिक असू शकतो. श्रेयस २९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच टी२० सामन्यांच्या सिरीजसाठी सहभागी नव्हता. त्यामुळे प्रकृती बरी झाल्यानंतर तो थेट भारतात परतणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Vivah Story: तुळशी विवाह का करतात? काय आहे नेमकी प्रथा?

Maharashtra Live News Update: पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली हजारो लिटर पाणी वाया

Maharashtra Politics: मविआमध्ये बिघाडी? काँग्रेसचा स्वबळाचा नारा, अहिल्यानगरच राजकारण तापलं

भाजपला कुबड्यांची गरज नाही; अमित शहांनी कुणाला दिला इशारा? पाहा व्हिडिओ

Celibrity Divorce: १४ वर्षांचा सुखी संसार मोडला! टीव्ही इंडस्ट्रीतील आणखी एका कपलचा घटस्फोट; चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT