Women’s World Cup: भारत-बांग्लादेशच्या सामन्यात पावसाची जोरदार बॅटिंग; मात्र विकेट पडली पाकिस्तानची

India-W vs Bangladesh-W Match Result: पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. मात्र परत नंतर सामन्याच्या मध्यंतरी पुन्हा पाऊस पडल्याने तो २७-२७ षटकांचा खेळवावा लागला. बांगलादेशचा डाव संपल्यानंतर भारतीय डावाचे ९ षटकेही पूर्ण झाले नव्हते तेव्हा पुन्हा पावसाने व्यत्यय आणला. पावसामुळे सामना रद्द झालेल्यामुळे पाकिस्तानंच मोठं नुकसान झालंय.
India-W vs Bangladesh-W Match Result:
Rain washes out India vs Bangladesh Women’s World Cup match; Pakistan faces huge setback in the points table.saam tv
Published On
Summary

भारत-बांगलादेश महिला वर्ल्ड कप सामना पावसामुळे रद्द झाला.

दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

पाकिस्तानच्या उपांत्य फेरीतील आशा धोक्यात आल्या.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ चा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यासह वर्ल्ड कपच्या साखळी सामन्याचा टप्पा पूर्ण झाला. रविवार, २६ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत भारत आणि बांगलादेशचा सामना खेळला गेला. सामन्यात बांगलादेशने २७ षटकांत ११९ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली. पण मात्र नऊ षटके पूर्ण झाली असतानाच पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना झाला. मात्र या सामन्याचा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कोणताच परिणाम होणार नव्हता. टीम इंडियासाठी ही फक्त एक औपचारिकता होती. मात्र बेंचवर बसलेल्या काही खेळाडूंची चाचणी घेण्याची संधी होती, तर बांगलादेशसाठी प्रतिष्ठा राखण्याची संधी होती. सामन्याच्या सुरुवातीआधीच

पावसाने बॅटिग करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सामना उशिराने सुरू करण्यात आला होता. मात्र सामन्याची षटके कमी करण्यात आली होती. २७-२७ षटकांचा हा सामना खेळवण्यात आला होता.

सामना रद्द झाल्याने पाकिस्तानला फटका

हा सामना रद्द झाल्यामुळे बांगलादेशला सर्वाधिक फायदा झाला, तर पाकिस्तानला नुकसान झाले. सामना अनिर्णित राहिल्यामुळे भारत आणि बांगलादेशला प्रत्येकी एक गुण मिळाला. सामना रद्द झाल्यामुळे टीम इंडियावर फारसा फरक पडला नाही, कारण भारत ७ गुणांसह चौथ्या स्थानावर असून उपांत्य फेरीत पोहोचलाय. तर सध्या आठव्या स्थानावर असलेला बांगलादेश आता ७ व्या स्थानावर पोहोचला. बांगलादेशचे आता एकूण ३ गुण झाले आहेत. यामुळे ते पाकिस्तानशी बरोबरीत आहेत. पण बांगलादेशने एक सामना जिंकला, तर पाकिस्तानी संघाला एकही सामना जिंकता आला नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com