IND W vs NZ W: 'या' 5 कारणांमुळे भारताने मारली सेमीफायनलमध्ये एन्ट्री; आता वर्ल्डकप जिंकणार का टीम इंडिया?

Women's World Cup 2025 Semi-Final: भारतीय महिला क्रिकेट टीमने अत्यंत महत्त्वपूर्ण सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ च्या सेमीफायनलमध्ये थाटात प्रवेश केला आहे. आता क्रिकेट चाहत्यांना आशा आहे की ही टीम वर्ल्डकप जिंकून इतिहास घडवेल.
india semifinal qualification
india semifinal qualificationsaam tv
Published On

भारतीय महिला क्रिकेट टीमने न्यूझीलंडचा पराभव करत वर्ल्ड कप २०२५ च्या सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. २३ ऑक्टोबर रोजी झालेला सामना भारतासाठी 'करो या मरो' अशा स्थितीचा होता. जर भारत हा सामना हरला असता, तर महिलांना वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची वेळ आली असती.

मात्र गुरुवारी नवी मुंबईच्या डी.वाय पाटील स्टेडियममध्ये रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला. या विजयामागे अनेक महत्त्वाची कारणं होती. मोठी धावसंख्या, अचूक गोलंदाजी आणि रणनीतीचा योग्य वापर. या मोठ्या आणि महत्त्वाच्या विजयामागील कारणांवर नजर टाकूया

दमदार ओपनिंग

भारताच्या विजयाचे सर्वात मोठं कारण म्हणजे प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना यांची जबरदस्त ओपनिंग पार्टनरशिर. दोघींनी मिळून २१२ रन्सची भागीदारी केली. प्रतिकाने १३४ बॉल्समध्ये १२२ रन्स केले. तर स्मृतीने ९५ चेंडूंमध्ये १०९ रन्सचीकरत शतक झळकावले. या दोघींनी मिळून २३ चौकार आणि ६ षटकार मारले, ज्यामुळे भारताने सुरुवातीलाच मजबूत स्थिती मिळवली.

india semifinal qualification
Virat Kohli: विराट पुन्हा शून्यावर आऊट; एडिलेड वनडेनंतर घेणार निवृत्ती? विकेटनंतर क्राऊडला केलेल्या इशाऱ्यामुळे चर्चांना उधाण

जेमिमा रोड्रिग्जचं कमबॅक

या वर्ल्ड कपमध्ये जेमिमाचा खेळ फारसा चांगला झाला नाही. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तिने ५५ चेंडूंमध्ये नाबाद ७६ रन्स करत जबरदस्त कमबॅक केलं. या खेळीत तिने ११ चौकार मारले.

सोफी डिवाइनची महत्त्वाची विकेट

न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाइन ही भारतासाठी मोठा धोका होती. तिने या वर्ल्ड कपमध्ये ६६.५० सरासरीने २६६ रन्स केले होते. त्यामुळे तिला लवकर बाद करणं गरजेचं होतं. हे काम रेणुका सिंहने उत्तम प्रकारे पार पाडलं आणि सोफीला केवळ ६ रन्सवर बाद केलं.

india semifinal qualification
Ind vs Aus: रोहित-श्रेयस-अक्षरनंतर डेथ ओव्हर्समध्ये हर्ष‍ित राणाची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियासमोर 265 रन्सचं आव्हान

भारतीय गोलंदाजांचा कहर

फलंदाजीनंतर भारताच्या गोलंदाजांनीही जबरदस्त कामगिरी केली. रेणुका सिंह आणि क्रांती गौड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. स्नेह राणा, श्री चरणी, दीप्ती शर्मा आणि प्रतिका रावल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. एकूण मिळून भारताने न्यूझीलंडचे ८ विकेट्स बाद केले.

india semifinal qualification
Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

DLS पद्धतीचा फायदा

या सामन्यात पावसामुळे अडथळा निर्माण झाला पण DLS पद्धतीचा फायदा भारताला मिळाला. भारताने ४९ ओव्हर्समध्ये ३ विकेट्स गमावून ३४० रन्स केले. यामध्ये टीम इंडियाने ३६ चौकार आणि ६ षटकार मारले. DLS नुसार, न्यूझीलंडला ४४ ओव्हर्समध्ये ३२५ रन्सचं लक्ष्य मिळालं. न्यूझीलंडने ८ विकेट्स गमावून फक्त २७१ रन्स केले आणि भारताने ५३ रन्सने विजय मिळवला.

india semifinal qualification
IND vs AUS: सामना हरला, मालिकाही गमावली; एकही धाव न घेता ऑस्ट्रेलिया जिंकली, अर्शदीपच्या गोलंदाजीवर नेमकं काय घडलं?

भारत वर्ल्ड कप ट्रॉफीपासून दोन सामने दूर

भारताचा बांगलादेशविरुद्ध एक सामना अजून बाकी आहे पण तो जिंकूनही भारत चौथ्या स्थानावरच राहणार आहे. आता भारताला उपांत्य फेरी आणि अंतिम सामना जिंकून वर्ल्ड कप ट्रॉफी मिळवायची आहे. सध्याच्या फॉर्मनुसार टीम इंडिया विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com