IND vs AUS: सामना हरला, मालिकाही गमावली; एकही धाव न घेता ऑस्ट्रेलिया जिंकली, अर्शदीपच्या गोलंदाजीवर नेमकं काय घडलं?

Australia Beat India In Adelaide ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांची मालिका २-० ने जिंकली आहे.
Australia Beat India In Adelaide ODI
IND vs AUSgoogle
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना अॅडिलेड येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ही मालिका २-० अशी जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करत २६४ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्स गमावून भारतावर दमदार विजय मिळवला. सामना जिंकण्यासाठी फक्त एक धावाची गरज असताना अर्शदीपच्या गोलंदाजीमध्ये अस काही घडलं की, एकही धाव न घेता ऑस्ट्रेलियालाने हा सामना जिंकला. पर्थ वनडे सामना गमावल्यानंतर, टीम इंडियाने अ‍ॅडलेडमध्येही सामना गमावला आणि त्यासोबतच मालिकाही गमावली.

ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने खराब सुरुवात केली. कर्णधार मिशेल मार्श ११ धावांवर बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने २८ धावांची खेळी खेळली. यानंतर, मॅथ्यू रेनशॉ आणि मॅथ्यू शॉर्ट ने तिसऱ्या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या तर, अक्षर पटेलने रेनशॉला ३० धावांवर पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर ने अॅलेक्स केरीचा विकेट घेतला. शॉर्ट आणि कूपर कॉनोली यांनी पाचव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. शॉर्टच्या विकेटनंतर भारत सामन्यात कमबॅक करेल अशी आशा होती. परंतु, मिचेल ओवेन आणि कूपर कॉनोली यांनी सहाव्या विकेटसाठी ५९ धावा जोडल्या. या भागीदारीने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. कूपर कॉनोली ६१ धावांवर नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी ५ धावांची गरज होती. अर्शदीप त्याचा ८ वा ओव्हर टाकत होता. पहिल्या २ बॉल्समध्ये ४ धावा काढल्या. जिंकण्यासाठी एका धावाची गरज असताना अर्शदीपने वाइड बॉल टाकला ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने एकही धाव न घेता सामना जिंकला.

Australia Beat India In Adelaide ODI
Sarfaraz Khan: 'खान' आडनावामुळे खेळाडूला डच्चू; सरफराजच्या सिलेक्शनवरून वाद पेटला, औवेसीनंतर काँग्रेस नेत्याचे गौतमवर 'गंभीर' आरोप

भारताचे खराब प्रदर्शन

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली, कर्णधार शुभमन गिल ९ धावांवर बाद झाला. कोहलीला खातेही उघडता आले नाही. त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच तो सलग दोन वनडे सामन्यात शून्य धावांवर बाद झाला. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांमुळे भारताने ५० ओव्हरमध्ये नऊ बाद २६४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पाने ४, झेवियर बार्टलेटने ३ आणि मिचेल स्टार्कने २ विकेट्स घेतले. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू शॉर्ट आणि कूपर कॉनोली यांनी अर्धशतके झळकावली, ज्यामुळे संघाला ४६.२ षटकांत आठ बाद २६५ धावांपर्यंत पोहोचता आले. मोहम्मद लिराजने १० ओव्हरमध्ये १ विकेट घेतला तर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि वॉश्गिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले. अक्षर पटेलने १० ओव्हरमध्ये ५२ धावा देत १ विकेट घेतला .

दुसऱ्या वनडे सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ:

ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू रेनशॉ, अॅलेक्स केरी( विकेटकिपर) मिशेल ओवेन, कूपर कॉनोली, मिशेल स्टार्क, झेवियर बार्टलेट, जोश हेझलवूड आणि अॅडम झांपा.

दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर) नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

Australia Beat India In Adelaide ODI
Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com