Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

India vs Australia 2nd ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा यानं ७३ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यानं ऑस्ट्रेलियातच त्यांच्याविरोधात वनडेमध्ये १००० धावा पूर्ण केल्या असून, अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
Sachin tendulkar, MS dhoni, Virat Kohli and Rohit sharma
Sachin tendulkar, MS dhoni, Virat Kohli and Rohit sharmasaam tv
Published On
Summary
  • रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात करून दाखवलं

  • ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये अव्वल

  • ऑस्ट्रेलियात त्यांच्याच विरोधात हजार धावा पूर्ण

  • विराट कोहली, सचिन तेंडुलकर, धोनीला टाकलं मागे

रोहित शर्माचा विक्रम

अॅडलेड वनडे सामना सुरू होण्याआधी रोहित शर्मा यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच देशात २० वनडे सामन्यांत ९९८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या वनडे सामन्यात दोन धावा घेताच रोहित ऑस्ट्रेलियात त्यांच्याविरुद्ध १००० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मानं डावाची सुरुवात अत्यंत सावधपणाने केली. सेट झाल्यानंतर त्यानं सुरेख फटके लगावले. ७३ धावा करून तो बाद झाला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडेमध्ये दोन्ही संघातील फलंदाजांमध्ये रोहितनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियात त्यांच्याच विरोधात आतापर्यंतच्या २१ वनडे सामन्यांत १०७१ धावा केल्या आहेत. १७१ धावांची त्यानं सर्वोच्च खेळी केली आहे.

विराट कोहली दुसऱ्या स्थानी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यातही विराट कोहलीला खातं उघडता आलं नाही. वनडे करिअरमध्ये पहिल्यांदाच तो सलग दोनदा शून्यावर बाद झाला आहे. तरीही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. त्यानं आतापर्यंत ८०२ धावा केल्या आहेत.

सचिन तेंडुलकर अजूनही टॉप ३

या यादीत तिसऱ्या स्थानी जगातील महान फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या विरोधात २५ वनडे सामन्यांत ७४० धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि ५ अर्धशतके आहेत. ऑस्ट्रेलियात त्यांच्याच विरोधात सचिन तेंडुलकरची सर्वोच्च वैयक्तीक धावसंख्या ११७ आहे.

Sachin tendulkar, MS dhoni, Virat Kohli and Rohit sharma
Rohit Sharma-Virat Kohli : रोहित शर्मा-विराट कोहली रिटायर होणार? वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराच्या वक्तव्यानं क्रीडाविश्वात खळबळ

महेंद्रसिंह धोनी

महेंद्रसिंह धोनी हा या यादीत चौथ्या स्थानी आहे. धोनीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत त्यांच्याच संघाविरोधात २१ वनडे सामन्यांत ५ अर्धशतकांसह ६८४ धावा केल्या आहेत. धोनीने सर्वाधिक नाबाद ८७ धावा केल्या आहेत.

स्टीव्ह स्मिथ एकमेव ऑस्ट्रेलियन फलंदाज

या यादीत पाचव्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आहे. टॉप ५ लिस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा हा एकमेव फलंदाज आहे. त्यानं ऑस्ट्रेलियात भारताविरुद्ध ११ वनडे सामन्यांत ६८३ धावा केल्या आहेत. त्यात त्याने ४ शतके आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. १४९ त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

Sachin tendulkar, MS dhoni, Virat Kohli and Rohit sharma
Rohit Sharma-Virat Kohli : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्डकप खेळणार का? अजित आगरकर पहिल्यांदाच इतका स्पष्ट बोलला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com