Ind vs Aus: रोहित-श्रेयस-अक्षरनंतर डेथ ओव्हर्समध्ये हर्ष‍ित राणाची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियासमोर 265 रन्सचं आव्हान

India vs Australia 2nd ODI Live Score: ऍडलेड ओव्हलमध्ये खेळल्या जाणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६५ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे.
India vs Australia 2nd ODI Live Score
India vs Australia 2nd ODI Live Scoresaam tv
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमधील दुसरा सामना आज एडिलेड ओव्हल मैदानावर खेळवला जातोय. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर २६५ रन्सचं लक्ष्य ठेवलं आहे. भारतीय टीमने ९ विकेट्स गमावून २६४ रन्स केले. या सामन्यात रोहित शर्मा ७३, श्रेयस अय्यर ६१ आणि अक्षर पटेल ४४ रन्सची खेळी करत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. हर्षित राणानेही १८ चेंडूंमध्ये नाबाद २४ रन्स करत शेवटी धावसंख्या मजबूत केली.

कशी झाली भारतीय टीमची फलंदाजी?

टॉस हरल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. पण टीम इंडियाच्या फलंदाजीची सुरुवात काहीशी निराशाजनक होती. केवळ १७ रन्सवर भारताला पहिला धक्का बसला. कर्णधार शुभमन गिल ९ रन्स करून जेवियर बार्टलेटच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच ओव्हरमध्ये बार्टलेटने विराट कोहलीलाही शून्यावर बाद केलं. कोहली सलग दुसऱ्या सामन्यात भोपळा न फोडता बाद झाला.

India vs Australia 2nd ODI Live Score
Shubman Gill: वादग्रस्त कृत्य! हात मिळवण्याच्या बहाण्यानं पाकिस्तानी चाहत्यानं...! शुभमन गिलसोबत ऑस्ट्रेलियात नेमकं काय घडलं?

यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११८ रन्सची पार्टनरशिप केली. या दोन्ही फलंदाजांच्या पार्टनरशिपमुळे भारताचा डाव सावरला. रोहितने ७४ बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण केलं. हे त्याचं २०१५ नंतरचं सर्वात संथ अर्धशतक ठरलं. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील ५९वे अर्धशतक होतं. श्रेयस अय्यरनेही ६७ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं.

स्टार्कने घेतली रोहितची विकेट

रोहित आणि आय्यर यांची भागीदारी मिचेल स्टार्कने तोडली. त्याने रोहितला जोश हेजलवूडच्या हाती कॅच आऊट केलं. रोहितने ९७ चेंडूंमध्ये ७३ रन्स केले. ज्यामध्ये ७ फोर आणि २ षटकार होते. यानंतर काही वेळातच श्रेयसही बाद झाला. त्याने ७७ चेंडूंमध्ये ७ चौकारांच्या मदतीने ६१ रन्स केले.

India vs Australia 2nd ODI Live Score
IND vs AUS: सिरीज जिंकायची असेल तर भारतासाठी 'करो या मरो'; १७ वर्षांचा विजयी रेकॉर्ड कायम ठेवणार टीम इंडिया?

यानंतर केएल राहुल (११), वॉशिंगटन सुंदर (१२) आणि नीतीश कुमार रेड्डी (८) या तिन्ही खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. मात्र अक्षर पटेलने ४४ रन्स करत भारताला २०० रन्सच्या पार नेण्यात मदत केली. शेवटच्या ओव्हर्समध्ये हर्षित राणा (२४*) आणि अर्शदीप सिंह (१३) यांनी चांगली फलंदाजी करत भारताला मजबूत स्कोअर मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून एडम झॅम्पाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

India vs Australia 2nd ODI Live Score
Virat Kohli: विराट पुन्हा शून्यावर आऊट; एडिलेड वनडेनंतर घेणार निवृत्ती? विकेटनंतर क्राऊडला केलेल्या इशाऱ्यामुळे चर्चांना उधाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com