Gautam Gambhir MS Dhoni And Manoj Tiwari saam tv
Sports

Team India : भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! गंभीरनंतर आता धोनीवर ऑलराउंडरचा धक्कादायक आरोप

Manoj Tiwari Alleges MS Dhoni : भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून देणारे आरोप माजी क्रिकेटपटूंकडून केले जात आहेत. फलंदाज मनोज तिवारी यानं तर गौतम गंभीरनंतर आता महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केले आहेत.

Nandkumar Joshi

  • महेंद्रसिंग धोनीवर माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप

  • चांगली कामगिरी करूनही पक्षपातीपणा केल्याचा दावा

  • यापूर्वी गौतम गंभीरवरही केली होती टीका

क्रिकेट हा खरं तर जंटलमन गेम, म्हणजेच सज्जनांचा खेळ. पण या आउटडोअर गेममध्ये देखील 'इंटर्नल पॉलिटिक्स' ठासून भरलं आहे, असं चित्र निर्माण होत आहे. मैदानात बाचाबाची, एकमेकांच्या अंगावर धावून जाणं, स्लेजिंग असले प्रकार वरवर घडतच असतात. पण आता दिग्गज खेळाडूंवर करिअर बर्बाद केल्याचे गंभीर आरोप देखील होत आहेत. त्यामुळं सज्जनांचा खेळ असलेलं क्रिकेटचं वर्तुळ ढवळून निघत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यावरील आरोपांना काही तास उलटत नाहीत, तोच आता भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीवरही खळबळ उडवून देणारे आरोप करण्यात आले आहेत.

भारतीय संघातील माजी खेळाडू मनोज तिवारी यानं हे आरोप केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रचंड संघर्ष करावा लागल्याचं सांगतानाच धोनीवर निशाणा साधला. मी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आवडता खेळाडू नव्हतो, असं तो म्हणाला. तिवारीनं भारतासाठी अखेरचा सामना जुलै २०१५ मध्ये झिम्बाब्वेच्या विरोधात खेळला होता. धोनी आणि मॅनेजमेंटकडून हवा तसा पाठिंबा मिळालाच नाही. चांगल्या अष्टपैलू कामगिरीमुळं भारतासाठी खेळण्याच्या अधिकाधिक संधी मिळू शकल्या असत्या, असंही तिवारीचं म्हणणं आहे.

२०११ मध्ये वेस्टइंडीज भारत दौऱ्यावर आला होता. तिवारीनं पाचव्या वनडेत शतक ठोकलं होतं. भारत ही मालिका ४-१ ने जिंकला होता. जुलै २०१२ मध्ये वनडे सामन्यात तिवारीनं चार विकेट घेतल्या होत्या. त्यामुळं श्रीलंकेला पराभूत करणं शक्य झालं होतं. सातत्यानं चांगली कामगिरी करूनही धोनीनं कधीच पाठिंबा दिला नाही. तो नेहमीच इतर खेळाडूंना सपोर्ट करायचा, असा आरोप तिवारीनं केलाय.

धोनी सर्वांचाच आवडता खेळाडू आहे. वेळोवेळी त्यानं आपल्या नेतृत्व क्षमतेनं ते सिद्धही केलंय. त्याचं नेतृत्व खूपच चांगलं होतं, असं मी नेहमीच म्हणतो. पण माझ्याबाबतीत मी सांगू शकत नाही. त्यावेळी काही खेळाडू त्याच्या आवडीचे होते आणि तो त्यांच्या पाठिशी नेहमी उभा राहायचा. अनेकांना हे माहीत आहे, पण पुढे येऊन कोणी बोलणार नाही, असंही तिवारी म्हणाला.

सातत्यानं चांगली कामगिरी करूनही त्याच्यावेळच्या खेळाडूंना जेवढ्या संधी मिळाल्या, तितक्या मला मिळाल्या नाहीत, असं तिवारी म्हणाला. धोनी, डंकन फ्लेचर आणि निवड समितीच याचं उत्तर देऊ शकतात. कारण मला अजून याचं उत्तर मिळालेलं नाही. शतक केल्यानंतरही मला संधी का दिली नाही, हे मी धोनीची भेट झाल्यानंतर त्याला नक्कीच विचारणार आहे, असंही तिवारी म्हणाला.

धोनीच्या नेतृत्वाचा आदर आहेच, असं सांगतानाच, त्या काळात मला इतर खेळाडूंप्रमाणे सपोर्ट मिळाला असता तर माझं करिअर नक्कीच वेगळ्या दिशेने जाऊ शकलं असतं, असंही तिवारी म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Street Market Mumbai: मुंबईतील फॅशन स्ट्रीट मार्केट नेमकं कुठं आहे?

बॉडी मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळताच टाकली रेड, आरोपी फरार

Bigg Boss 19 : तान्या मित्तलवर सलमान भडकला; अशनूरच्या डोळ्यात आले पाणी, 'वीकेंड का वार'मध्ये नेमकं घडलं काय?

Maharashtra Live News Update : जुन्या मुंबई पुणे हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

'सुनेच्या पगारातून सासऱ्याला २० हजार रूपये मिळतील'; उच्च न्यायालयाचा निकाल, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT