ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तूशास्त्रानुसार, दिशेला खूप महत्तव दिले जाते. यामुळे घरातील प्रत्येक गोष्ट ही दिशेनुसार ठेवली जाते.
जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार, घरात कोणत्या दिशेला आरसा लावणे शुभ मानले जाते.
वास्तुनुसार, घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावलेला आरसा हानिकारक असतो.
शास्त्रांनुसार, या दिशेला आरसा ठेवल्याने व्यक्तीमध्ये भीतीची स्थिती निर्माण होते.
घरात चुकीच्या दिशेने आरसा ठेवल्याने घरात भांडणे होण्याची शक्यता वाढते.
बेडसमोर आरसा ठेवल्याने घरात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
जर आरश्याची काच तुटलेली असेल तर, ती लगेचच काढून टाकावी. तुटलेली काच घरात ठेवणे अशुभ मानले जाते.
वास्तूशास्त्रानुसार, आरसा हा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.