सरफराज खानची तुफानी इनिंग, १५ चेंडूत अर्धशतक
पंजाब विरुद्ध मुंबईचा मोठा विजयाचा पाया
षटकार-चौकारांच्या सणानं मैदानावर जल्लोष
विजय हजारे ट्रॉफीमध्ये सरफराज खान नावाच्या वादळात पंजाबचा धुव्वा उडालाय. मुंबईचा स्टार फलंदाज सरफराज खाननं पंजाब विरुद्धातील ७ फेरीतील सामन्यात फलंदाजी करताना फक्त १५ चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलंय. सरफराज खानने १० व्या षटकात ३ चौकार आणि ३ षटकार मारले. पंजाब संघाच्या कर्णधार अभिषेक शर्मा १० षटक टाकत होता, त्याने सहा चेंडूत ३० धावा दिल्या.
दरम्यान प्रथम फलंदाजी करताना पंजाबने मुंबईसमोर २१७ धावांचे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना, सरफराज खानने तुफान फलंदाजी केली. त्याने अवघ्या २० चेंडूत ७ चौकार आणि पाच उत्तुंग षटकार मारत ६२ धावांची धमाकेदार खेळी केली. सरफाज खान नावाच्या वादळाला मयंक मार्कंडेने शांत करत त्याला एलबीडब्ल्यू म्हणजेच पायचीत केलं.
मुंबई संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यावेळी मुंबई संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यांनी पंजाबच्या संघाला सुरुवातीलाच धक्के दिले. मुंबई गोलंदाजांनी पंजबाचा कर्णधार अभिषेक शर्माला अवघ्या ८ धावांवर आणि प्रभसिमरन सिंगला ११ धावांवर बाद केलं. दोन्ही फलंदाजी पंजाब संघासाठी मोठी कामगिरी करणारे मोठी धावसंख्या उभारणारे फलंदाज आहेत.
मात्र मुंबईविरुद्धात दोन्ही खेळाडू अपयशी ठरलेत. दरम्यान अनमोलप्रीत सिंग आणि रमनदीप सिंग यांच्या अर्धशतकी खेळीमुळे पंजाबनं २१६ धावा केल्या. परंतु संपूर्ण संघ हा ५० षटकांपर्यंत खेळू शकला नाही.
पंजाबच्या संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून अंगक्रिश रघुवंशी, मुशीर खान आणि सरफराज खान यांनी शानदार फलंदाजी केली. अंगक्रिश रघुवंशी आणि मुशीर खान यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. त्यानंतर क्रमांक तीनवर फलंदाजीसाठी आलेल्या सरफराज खानने धुव्वाधार फलंदाजी करत अवघ्या १५ चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं. अभिषेक शर्माच्या षटकात त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. सरफराज खानने एकूण ३० धावा ठोकल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.