ODI World Cup Final IND vs AUS 2023: Saamtv
Sports

Cricketers Salary: भारत अन् ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनात किती फरक आहे?

Salary Of India And Australian Cricketers : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना किती मानधन मिळते?

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मजबूत संघ आहेत. भारतीय संघाला वनडे वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चामूयांशिलची ट्रॉफी जिंकण्यापासून थांबवण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलंय.

भारतात झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये पराभूत केलं होतं. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपच्या फायनलमध्येही भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं होतं. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना किती मानधन मिळतं ? माहितेय का?

ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथ हे ऑस्ट्रेलियाचा प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. या खेळाडूंना क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ३५०००० डॉलर दिले जातात. तर कर्णधार पॅट कमिन्सला ७५०००० डॉलर मानधन म्हणून दिले जातात. यासह संघातील इतर खेळाडू जोश हेझलवूड, उस्मान ख्वाजा, मार्कस स्टोइनिस आणि ॲलेक्स कॅरीसारख्या खेळाडूंना २७८००० डॉलर इतकं मानधन दिलं जातं.

भारत - ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनात किती फरक?

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना १ टी -२० सामना खेळण्यासाठी १० हजार डॉलर मिळतात. तर एक वनडे सामना खेळण्यासाठी १५ हजार डॉलर मिळतात. यासह ऑस्ट्रेलियन खेळाडूंची बिग बॅश लीग आणि इतर लीग स्पर्धांमधूनही कमाई होते.

भारतीय खेळाडूंना किती मानधन मिळते?

बीसीसीआयकडून ग्रेड ए प्लस कॅटेगरीमध्ये असलेल्या खेळाडूंना ७ कोटी रुपये दिले जातात. तर ए कॅटेगरीमध्ये असलेल्या खेळाडूंना ५ कोटी दिले जातात. यासह ग्रेड बी कॅटेगरीमध्ये असलेल्या खेळाडूंना ३ कोटी रुपये. तर ग्रेड सी मध्ये असलेल्या खेळाडूंना १ कोटी रुपये दिले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

SCROLL FOR NEXT