Ind vs Aus 2nd Test: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाज दुसऱ्या कसोटीतून होऊ शकतो बाहेर
team india

Ind vs Aus 2nd Test: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाज दुसऱ्या कसोटीतून होऊ शकतो बाहेर

Shubman Gill Injury: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
Published on

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना ॲडीलेडमध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

पहिल्या कसोटीतून संघाबाहेर असलेला फलंदाज शुभमन गिल दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर होऊ शकतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला येत्या ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा डे नाईट कसोटी सामना असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सुरू होईल.

या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये रंगला होता. या सामन्यापूर्वी सराव करत असताना शुभमन गिलच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पहिला कसोटी सामना खेळता आला नव्हता.

जर दुसऱ्या सामन्यातही गिलला संघात स्थान दिलं गेलं नाही, तर त्याच्या जागी ध्रुव जुरेल किंवा देवदत्त पडीक्कलला संधी दिली जाऊ शकते. दरम्यान तो ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सराव सामन्यातूनही नाही होऊ शकतो. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दुखापतग्रस्त झाल्यानंतर मेडिकल टीमने गिलला १०-१४ दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता.

Ind vs Aus 2nd Test: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाज दुसऱ्या कसोटीतून होऊ शकतो बाहेर
IND vs AUS: दुसऱ्या सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं! स्टार अष्टपैलू होऊ शकतो संघाबाहेर

तसेच सूत्राने पुढे म्हटले की, ' गिल सराव सामन्यातही खेळताना दिसून येणार नाही. यासह दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. दुखापतीतून सावरल्यानंतरही त्याला कसून सराव करावा लागणार आहे.'

यशस्वी जयस्वाल सलामीला फलंदाजीला आल्यापासून शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली जात आहे. या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्याने या क्रमांकावर खेळताना ३ शतकं झळकावली आहेत.

Ind vs Aus 2nd Test: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाज दुसऱ्या कसोटीतून होऊ शकतो बाहेर
IND vs AUS 1st Test: भारताचा पर्थमध्ये एकतर्फी विजय! बुमराह, जयस्वालसह हे खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकिपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्म सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com