IND vs AUS: दुसऱ्या सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं! स्टार अष्टपैलू होऊ शकतो संघाबाहेर

Mitchell Marsh: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
IND vs AUS: दुसऱ्या सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं! स्टार अष्टपैलू होऊ शकतो संघाबाहेर
australiatwitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ ०-१ ने पिछाडीवर आहे. मालिकेतील दुसरा सामना येत्या ६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. टी-२० संघाचा कर्णधार मिचेल मार्श दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी ब्यू वेबस्टरला संघात स्थान दिलं गेलं आहे. अॅडिलेड कसोटी सुरु होण्यापूर्वी जर मार्श पूर्णपणे फिट झाला नाही, तर वेबस्टरला संघात स्थान दिले जाऊ शकते.

मार्शला पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान दिलं गेलं होतं. या सामन्यात त्याने १७ षटक गोलंदाजी केली आणि ३ गडी बाद केले होते. मार्श गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने तो पूर्णपणे फिट होणं गरजेचं आहे. दुसरा कसोटी सामना सुरु व्हायला अजूनही १० दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे त्याच्यावर दुखापतीतून सावरण्यासाठी बराच वेळ आहे.

IND vs AUS: दुसऱ्या सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं! स्टार अष्टपैलू होऊ शकतो संघाबाहेर
Ind vs Aus: पर्थचा कौल अखेर भारताच्याच बाजूने; टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव

कोण आहे वेबस्टर

तर दुसरीकडे वेबस्टरबद्दल बोलायचं झालं, तर फलंदाजीसह तो वेगवान गोलंदाज आहे. गेल्या शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत त्याने गोलंदाजी करताना ३० गडी बाद केले होते. तर भारतीय अ संघाविरुद्ध झालेल्या अनधिकृत सामन्यात फलंदाजी करताना त्याने फलंदाजीत १४५ धावा केल्या आणि गोलंदाजी करताना त्याने ७ गडी बाद केले होते.

काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत तो ग्लूसेस्टरशायर संघाकडून खेळताना दिसून आला होता. या स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने २३३ धावा केल्या होत्या. यासह गोलंदाजीत त्याने १६ गडी बाद केले होते.

IND vs AUS: दुसऱ्या सामन्यापूर्वी टेन्शन वाढलं! स्टार अष्टपैलू होऊ शकतो संघाबाहेर
IND vs AUS 1st Test Day 3: यशस्वी- विराटनंतर, बुमराह चमकला! टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

केव्हा सुरु होणार दुसरा सामना?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून सुरु झाला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्याला येत्या ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com