Shubman Gill: गिल मार रहा है... फिफ्टी पूर्ण करताच शिखर धवनच्या मोठ्या रेकॉर्डची केली बरोबरी

Shubman Gill Record News In Marathi: या सामन्यात अर्धशतक झळकावताच शुभमन गिलच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
Shubman Gill: गिल मार रहा है... फिफ्टी पूर्ण करताच शिखर धवनच्या मोठ्या रेकॉर्डची केली बरोबरी
shubman gilltwitter
Published On

IND vs NZ 3rd Test, Shubman Gill Record: भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलची बॅट तिसऱ्या सामन्यात चांगलीच गरजली. न्यूझीलंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना, २३७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना, गिलने ६६ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

या शानदार खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि १ षटकार खेचला. गिलने रिषभ पंतसोबत मिळून ९६ धावांची भागीदारी केली. यादरम्यान त्याने शिखर धवनच्या मोठ्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

या अर्धशतकी खेळीसह गिलन कसोटी क्रिकेटमध्ये १२ किंवा त्यापेक्षा अधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एन्ट्री केली आहे. गिलने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना ७ अर्धशतकं झळकावली आहेत.

यासह त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ५ शतकं झळकावण्याची नोंद आहे. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या नावेही कसोटीत १२ वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करण्याची नोंद आहे.

यासह माजी फलंदाज अंशुमन गायकवाड आणि नारी कॉन्ट्रॅक्टर यांनी देखील आपल्या कसोटी कारकिर्दीदरम्यान १२ वेळेस ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली होती.

Shubman Gill: गिल मार रहा है... फिफ्टी पूर्ण करताच शिखर धवनच्या मोठ्या रेकॉर्डची केली बरोबरी
IND vs NZ: जडेजाने एकाच ओव्हरमध्ये फिरवली मॅच; न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत -VIDEO

भारतीय संघासाठी सर्वाधिक वेळेस ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनने ११९ वेळेस हा कारनामा केला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना डॅरील मिशेलने सर्वाधिक ८६ धावांची खेळी केली. तर विल यंग ७१ धावा करत माघारी परतला.

Shubman Gill: गिल मार रहा है... फिफ्टी पूर्ण करताच शिखर धवनच्या मोठ्या रेकॉर्डची केली बरोबरी
Rishabh Pant: शतक हुकलं पण इतिहास रचला! अर्धशतक झळकावताच रिषभने दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड मोडला

न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच दिवशी ४ मोठे धक्के बसले. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि मोहम्मद सिराज हे स्वस्तात माघारी परतले. तर दुसऱ्या दिवशी शुभमन गिल आणि रिशभ पंतने अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला कमबॅक करुन दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com