IND vs NZ 3rd Test: रविंद्र जडेजाने रचला इतिहास! 5 विकेट्स घेताच दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान

Ravindra Jadeja News In Marathi: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात रविंद्र जडेजाने ५ विकेट्स घेताच एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
IND vs NZ 3rd Test: रविंद्र जडेजाने रचला इतिहास! 5 विकेट्स घेताच दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान
ravindra jadejatwitter
Published On

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून रविंद्र जडेजाने शानदार गोलंदाजी केली. यादरम्यान त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान

भारतीय संघाला पहिल्या डावात गोलंदाजी करताना आकाश दीपने सुरुवात करुन दिली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडला दुसरा मोठा धक्का दिला. सुरुवातीला २ मोठे धक्के बसल्यानंतर,रचिन रविंद्रही स्वस्तात माघारी परतला.

त्यानंतर ४५ व्या षटकात जडेजाने न्यूझीलंडला लागोपाठ २ धक्के दिले. त्याने विल यंग आणि डॅरील मिशेलची भागीदारी मोडत त्याने यंगला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर याच षटकातील पाच चेंडूवर त्याने टॉम ब्लंडेललाही बाद करत माघारी धाडलं.

IND vs NZ 3rd Test: रविंद्र जडेजाने रचला इतिहास! 5 विकेट्स घेताच दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान
IND vs NZ, Toss: न्यूझीलंडचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय! पुणे कसोटीतील हिरोला बसवलं; पाहा Playing XI

जडेजाने घेतल्या ५ विकेट्स

एकाच षटकात २ विकेट्स घेतल्यानंतर त्याने ५३ व्या षटकात ग्लेन फिलिप्सला क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर ६१ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने ईश सोडीला पायचित करत माघारी धाडलं. याच षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने मॅट हेनरीची दांडी गुल केली. यासह त्याने आपल्या ५ विकेट्स पूर्ण केल्या.

IND vs NZ 3rd Test: रविंद्र जडेजाने रचला इतिहास! 5 विकेट्स घेताच दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान
IND vs NZ: जडेजाने एकाच ओव्हरमध्ये फिरवली मॅच; न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत -VIDEO

जडेजाने रचला इतिहास

जडेजाने १४ वेळेस कसोटी क्रिकेटमध्ये ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. यासह त्याने काही मोठे रेकॉर्ड्स देखील मोडून काढले आहेत. जडेजा हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. जडेजाने आतारपर्यंत ३१३ गडी बाद केले आहेत. या यादीत माजी गोलंदाज अनिल कुंबळे अव्वल स्थानी आहेत. त्यांच्या नावे कसोटीत ६१९ गडी बाद करण्याची नोंद आहे.

भारतीय संघाकडून सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

अनिल कुंबळे -६१९

आर अश्विन- ५५३

कपिल देव- ४३४

हरभजन सिंग - ४१७

रविंद्र जडेजा- ३१२

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com