Rishabh Pant: शतक हुकलं पण इतिहास रचला! अर्धशतक झळकावताच रिषभने दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड मोडला

Rishabh Pant Half Century: भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
Rishabh Pant: शतक हुकलं पण इतिहास रचला! अर्धशतक झळकावताच रिषभने दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड मोडला
rishabh Panttwitter
Published On

Rishabh Pant News In Marathi: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना, न्यूझीलंडला २३५ धावा करता आल्या आहेत.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला सुरुवातीला मोठे धक्के बसले. मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि रिषभ पंतने मिळून संघाचा डाव सांभाळला. दरम्यान अर्धशतक झळकावताच रिषभ पंतच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

रिषभ पंतच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

न्यूझीलंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली होती. या जोडीकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र रोहित १८ धावा करत माघारी परतला.

त्यानंतर यशस्वी जयस्वाल ३०, मोहम्मद सिराज शून्यावर आणि विराट कोहली ४ धावांवर तंबूत परतला. संघातील मुख्य फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर, रिषभ पंत आणि शुभमन गिलवर मोठी जबाबदारी होती.

Rishabh Pant: शतक हुकलं पण इतिहास रचला! अर्धशतक झळकावताच रिषभने दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड मोडला
IND vs NZ, 3rd Test: भारतीय गोलंदाज चमकले, पण फलंदाज ढेपाळले; पहिल्याच दिवशी ४ फलंदाज तंबूत

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना, रिषभ पंत आण शुभमन गिलने संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. दोघांनी मिळून ९६ धावांची भागीदारी केली. यादरम्यान रिषभ पंत ५९ चेंडूत ६० धावांवर तंबूत परतला. दरम्यान या अर्धशतकासह त्याने फारुख इंजिनिअर यांचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Rishabh Pant: शतक हुकलं पण इतिहास रचला! अर्धशतक झळकावताच रिषभने दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड मोडला
IND vs NZ: जडेजाने एकाच ओव्हरमध्ये फिरवली मॅच; न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत -VIDEO

रिषभ पंत हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने फारुख इंजिनिअर यांना मागे सोडलं आहे. फारुख यांच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये १८ अर्धशतक झळकावली आहेत. या यादीत एमएस धोनी अव्वल स्थानी आहे. धोनीने ३९ अर्धशतकं झळकावली आहेत. तर सय्यद किरमानी यांच्या नावे १४ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे.

भारतीय संघासाठी कसोटीत सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारे यष्टीरक्षक फलंदाज

  • एमएस धोनी- ३९

  • रिषभ पंत- १९

  • फारुख इंजिनिअर -१८

  • सय्यद किरमानी - १४

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com