Glenn Maxwell: मॅक्सवेलने केली हिटमॅन रोहितची बरोबरी; २००च्या स्ट्राईक रेटने ५० चेंडूत ठोकलं शतक

Aus Vs WI T20 match : वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी केलीय. २०० च्या स्ट्राईक रेटने शतक झळकावून त्याने T20I मध्ये एका विशेष विक्रमाची बरोबरी केली आहे.
Glenn Maxwell: मॅक्सवेलने केली हिटमॅन रोहितची बरोबरी; २००च्या स्ट्राईक रेटने ५० चेंडूत ठोकलं शतक
Published On

Aus Vs WI T20 match Glenn Maxwell Century In 50 Balls :

ग्लेन मॅक्सवेलने मोठ्या फटकेबाजी करत शानदार शतक ठोकलं. त्याच्या तडाखेबाज शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला विजय मिळला. ॲडलेडमधील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला पराभूत केलं. मॅक्सवेलने अवघ्या ५० चेंडूमध्ये २०० च्या स्ट्राईक रेटने शतक केलं. ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलच्या कामगिरीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मॅक्सवेलने ५५ चेंडूंत नाबाद १२० धावा केल्या. (Latest News)

यात ८ षटकार आणि १२ चौकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने २४१-४ अशी जबरदस्त धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा T20Iसामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडिजसमोर २४१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाने केवळ २०७ धावा करू शकला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मॅक्सवेलचा 'मॅक्स' गेम

ऑस्ट्रेलियन खेळाडू आपल्या स्फोटक खेळासाठी ओळखला जातो. आज वेस्ट इंडिजसोबत खेळताना त्याची परत एकदा प्रचिती दिली. ग्लेन मॅक्सवेलचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाचवे शतक होते. यासह तो T20I मध्ये ५ शतके झळकावणारा दुसरा आणि पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज बनलाय. सर्वाधिक शतकांच्या बाबतीत त्याने रोहित शर्माची बरोबरी केलीय.

हिटमॅनने T20I मध्ये ५ शतकं केली आहेत. त्याने अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत शतक झळकावले होते. दरम्यान टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये मॅक्सवेलने सुर्यकुमार यादवला मागे टाकले आहे. सूर्याच्या नावावर T20 मध्ये ४ शतके आहेत. या यादीत बाबर आझमही ३ शतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

T20I मध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे खेळाडू

  • ग्लेन मॅक्सवेल - ५ शतके

  • रोहित शर्मा - ५ शतके

  • सूर्यकुमार यादव- ४ शतके

  • सबावून द्विजी- ३ शतके

  • बाबर आझम - ३ शतके

Glenn Maxwell: मॅक्सवेलने केली हिटमॅन रोहितची बरोबरी; २००च्या स्ट्राईक रेटने ५० चेंडूत ठोकलं शतक
Who is Akash Deep:आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवणारा आकाश दीप आहे तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com