Viral Video saam tv
Sports

Viral Video: अगं बाई बस खाली...! बुमराहच्या गोलंदाजीवर साक्षीचं रिएक्शन व्हायरल, धोनीलाही हसू आवरेना

MS Dhoni reaction to Sakshi Dhoni celebration video: भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल सामन्यात साक्षी धोनीची मजेदार प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बुमराहने कॅच घेतल्याचा गैरसमज झाल्यानंतर साक्षी आनंदाने उड्या मारताना दिसली

Surabhi Jayashree Jagdish

काल ज्या निकालाची चाहत्यांना अपेक्षा होती तोच निकाल टीम इंडियाने लावला. भारताने सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री घेतली आहे. वानखेडेच्या मैदानावर या दोन टीम्समध्ये सेमीफायनलचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात टीम इंडियाने ७ विकेट्सने सामना जिंकला.

वानखेडेच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. हा सामना पाहण्यासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी देखील आले होते. सामना अंतिम टप्प्यात असताना साक्षी धोनीची एक गमतीशीर रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल झालीये.

इंग्लंड लक्ष्याचा पाठलाग करत असताना १८ वी ओव्हर फेकण्यासाठी जसप्रीत बुमराह आला. इंग्लंडचा फलंदाज सॅम करनने त्याच्या एका चेंडूवर फॉरवर्ड शॉट मारला. बुमराहने त्याच्या फॉलो-थ्रूमध्ये चेंडू ब्लॉक केला. दरम्यान, स्टँडमध्ये बसलेल्या साक्षी धोनीला वाटलं की बुमराहने एक छान कॅच घेतला आहे. ती आनंदाच्या भरात तिच्या सीटवर उडी मारून नाचू लागली.

मात्र हा एक बंप कॅच होता. चेंडू बुमराहच्या हातात पोहोचण्यापूर्वीच जमिनीला स्पर्श करत होता, म्हणजेच विकेट पडली नव्हती. साक्षी धोनीच्या मागे उभ्या असलेल्या एमएस धोनीने तिला आनंद साजरा करताना पाहिलं तेव्हा तो हसला आणि तिला शांत बस असं सांगू लागला. धोनी आणि साक्षीची शांत आणि मजेदार प्रतिक्रिया पाहून आजूबाजूचे लोकही हसायला लागले. स्टँडमध्ये घडलेला हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांना तो खूप आवडला.

एमएस धोनी आणि साक्षी धोनीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सने मजेशीर कमेंट्स केल्यात. एका युजरने लिहिलंय, 'बिचाऱ्या साक्षीला वाटलं की कॅच घेतला आहे, म्हणूनच ती आनंदाने उड्या मारू लागली.' दुसऱ्या युजरने म्हटलं की, जर डीआरएस तुमच्या मागे उभा असेल तर तुम्ही त्यांना विचारायला हवं होतं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT