Shruti Vilas Kadam
सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा विवाह सानिया चंडोकसोबत मोठ्या थाटामाटात मुंबईत पार पडला. या लग्नात क्रिकेट, बॉलिवूड आणि उद्योगविश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या लग्नसोहळ्यात ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन आणि जया बच्चन देखील सहभागी झाले होते.
लग्नात शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना सोबत आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्यात आणखी ग्लॅमर वाढल्याचे पाहायला मिळाले.
या सोहळ्यात आमिर खान देखील उपस्थित राहिले. त्यांनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देत त्यांच्या नव्या आयुष्यासाठी आशीर्वाद दिले.
प्रसिद्ध गायिका आशा भोसले तसेच गायक सोनु निगम यांसारख्या कलाकारांनीही लग्नात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या विवाहसोहळ्यात महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड आणि हरभजन सिंग यांसारखे दिग्गज क्रिकेटपटूही उपस्थित होते.
अर्जुन आणि सानियाच्या लग्नाचे प्री-वेडिंग कार्यक्रम ३ मार्चपासून सुरू झाले होते. या भव्य सोहळ्यामुळे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली.