Sachin Tendulkar son Arjun Sania wedding date saam tv
Sports

Arjun Tendulkar: सचिनच्या लेकाच्या लग्नाची तारीख ठरली; कुठे अन् कधी अर्जुन-सानिया अडकणार लग्नबंधनात, महत्वाची माहिती समोर

Sachin Tendulkar son Arjun Sania wedding date: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. सचिन यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि त्याची मंगेतर सानिया चांदोक यांचा विवाह मार्चमध्ये होणार असल्याची माहिती आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. येत्या काही दिवसात अर्जुन तेंडुलकर त्याच्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. अर्जुन त्याची होणारी बायको सानिया चंडोकसोबत सात फेरे घेणार आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता.

अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नाची तारीख आता जाहीर झाली आहे. ज्या आठवड्यात होळी आहे त्याच आठवड्यात अर्जुनच्या लग्नाचा बार उडणार आहे. लग्नाच्या दोन दिवस अगोदरपासून विधींना सुरुवात होणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक ५ मार्च २०२६ रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. या दोघांच्याही लग्नाच्या विधी ३ मार्चपासून सुरु होणार आहेत. तर ४ मार्च रोजी होळीचा सण असून संपर्ण देशभरात तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे.

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, लग्नासंबंधीच्या सर्व विधी मुंबईमध्येच पार पाडल्या जाणार आहेत. याची सुरुवात ३ मार्चला होणार असून यामध्ये जवळच्या मित्र परिवारातील लोकांचा समावेश असणार आहे.

ऑगस्टमध्ये झाला होता साखरपुडा

अर्जुन आणि सानियाच्या साखरपुड्याची बातमीही अचानक आली होती. या दोघांचाही १३ ऑगस्ट रोजी साखरपुडा झाला होता. यावेळी त्यांचे फोटोही प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या साखरपुड्याला जवळचे मित्र आणि कुटुंबीय देखील उपस्थित होते. साखरपुड्यानंतर काही वेळातच एका कार्यक्रमात सचिनला याबाबत विचारलं असता त्याने या बातमीला दुजोरा दिला होता.

कोण आहे सानिया चंडोक?

सानिया ही मुंबईतील प्रख्यात उद्योगपती रवी घई यांची नात आणि गौरिका चांडोक आणि सनी चांडोक यांची मुलगी आहे. रवी घई हॉटेल उद्योग आणि आईस्क्रीम ब्रँड ब्रुकलिन क्रीमरीशी देखील संबंधित आहेत. सानिया चांडोक ही एक यशस्वी बिझनेस वुमन देखील आहे.

सानियाचे अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर या दोघी एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहे. सारा आणि सानियाचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असतात. नुकतंच सानिया आणि अर्जुन साराच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येही दिसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT