लिजेंड्स क्रिकेट लीग २०२३ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेत आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटू एकमेकांविरुद्ध खेळताना दिसून येत आहेत. या स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना इंडिया कॅपिटल आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना एस श्रीसंत आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या बाचाबाचीमुळे चर्चेत आला. श्रीसंतने या सामन्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्याने गंभीर काय म्हणाला याबाबत खुलासा केला आहे.
लिजेंड्स लीग स्पर्धेतील एलिमिनेटरच्या सामन्यात गौतम गंभीरने श्रीसंतच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकार मारले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की, श्रीसंत गंभीरकडे पाहताना दिसतोय तर गंभीरही त्याला काहीतरी बोलताना दिसून येत आहे.
त्यावेळी गंभीर त्याला गोलंदाजी करण्याचा इशारा करताना दिसून येत आहे. तर व्हायरला होत असलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,दोघेही खेळाडू आमने सामने आले आहेत.तर संघातील इतर खेळाडू त्यांना थांबवताना दिसून येत आहेत. (Latest sports updates)
हा सामना झाल्यानंतर श्रीसंतने एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात तो मैदानाबाहेर उभा असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये श्रीसंथ गंभीरला भांडखोर असं म्हणताना दिसून आला आहे. श्रीसंथ काय म्हणाला ही बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.. - गौतम गंभीर तर 'भांडखोर', बाचाबाचीनंतर श्रीसंतचे गंभीर आरोप
श्रीसंतने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने मैदानावर नेमकं काय घडलं याबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला की, 'मैदानात गंभीर मला फिक्सर-फिक्सर असं म्हणत होता.अंपायरसमोरही तो मला फिक्सर म्हणत गोलंदाजी करायला जा असं म्हणत होता. मी तिथून निघून गेलो तरी तो तोच शब्द वापरत राहिला. मी त्याच्याविरुद्ध एकही वाईट शब्द वापरला नाही. तो अनेकांशी असाच वागतोय. गौतम गंभीरकडे भरपूर पैसा आहे आणि त्याचा पीआरही खूप मजबूत आहे.'
एस श्रीसंतने दोन व्हिडिओ शेअर केल्यानंतर गंभीरनेही ट्वीट शेअर करत प्रत्युत्तर दिलं आहे. त्याने या ट्वीटमध्ये स्वत:चा एक हसणारा फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून,'जेव्हा जगाचे लक्ष स्वत:कडे वेधायचे असते तेव्हा ते हसू.'असं लिहीलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.