
लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत भारताचे माजी खेळाडू गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान हा वाद झाल्यानंतर श्रीसंतने एक व्हिडिओ शेअर करत गंभीरवर मोठे आरोप केले आहेत. यासह त्याने मैदानात नेमंक काय घडलं याबाबत खुलासा केला आहे.
तर झाले असे की, लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेतील एलिमिनेटरच्या सामन्यात इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात ६ षटकांचा खेळ झाल्यानंतर हा वाद झाला. त्यावेळी इंडिया कॅपिटल्सने ६० धावा केल्या होत्या. तर गौतम गंभीर ५१ धावांवर नाबाद होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, गौतम गंभीर आणि श्रीसंत एकमेकांसोबत वाद घालताना दिसून येत आहेत. यादरम्यान इतर खेळाडू श्रीसंतला थांबवताना दिसून येत आहेत. (Latest sports updates)
काय म्हणाला श्रीसंत?
या सामन्यानंतर व्हिडिओ शेअर करत श्रीसंतने गौतम गंभीरवर मोठे आरोप केले आहेत. तो म्हणाला की,'मिस्टर फायटरसोबत जे काही घडलंय त्यावर मला काहीतरी स्पष्टीकरण द्यायचं होतं. जो नेहमीच आपल्या सहकाऱ्यांसोबत भांडतो, तो आपल्या वरिष्ठ खेळाडूंचाही आदर करत नाही. ज्यात वीरु (सेहवाग) भाई आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे. आजही तसंच काहीतरी घडलंय. कारण नसतानाही तो मला काहीतरी बोलत होता. जे खूप असभ्य होते. हे गौतम गंभीरने म्हणायला नको होतं.'
'मला तुम्हाला इतकच सांगायचं आहे की, माझी काहीच चूक नाहीये. गौतीने काय केलंय हे तुम्हाला लवकर कळेलच. त्याने ज्या शब्दांचा वापर केला आणि क्रिकेटच्या मैदानावर लाईव्ह सामन्यात तो जे काही बोललाय ते स्वीकार्य नाहीये. तो असं काही बोलून गेलाय जे त्याने बोलायला नको होतं. मला फक्त इतकच सांगायचं आहे की, तुम्हा सर्वांना समजायला हवं, मी तुम्हाला सर्व सांगेल तो नेमकं काय म्हणाला आहे. जर तुम्ही सहकाऱ्यांचा आदर केला नाही तर, लोकांचं प्रतिनिधित्व करण्यात काय अर्थ आहे.' असं गौतम गंभीर म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.