Ruturaj gaikwad reveals the reason behind csk defeat against amd2000 twitter
Sports

CSK vs PBKS: चेन्नईच्या पराभवाचं नेमकं कारण काय? ऋतुराज गायकवाडने केला खुलासा

Ruturaj Gaikwad Statement: पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवाचं कारण काय? जाणून घ्या.

Ankush Dhavre

पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकअखेर ७ गडी बाद १६२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाने १७.५ षटकात ७ गडी राखून हे आव्हान पूर्ण केलं. दरम्यान या सामन्यातील पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

या सामन्यातील पराभवानंतर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) म्हणाला की,' या खेळपट्टीवर आम्ही २०० धावा करायला हव्या होत्या. मात्र आम्ही १८० धावा देखील करू शकलो नाही. यासह दिपक चाहर पहिल्याच षटकात दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर आमच्या संघात केवळ २ गोलंदाज शिल्लक होते. त्यात दव आल्याने गोलंदाजांची डोकेदुखी आणखी वाढली. हा सामना आमच्यासाठी खूप कठीण होता. इथून पुढे आमचे ४ सामने शिल्लक आहेत. आम्ही कमबॅक करण्याचा प्रयत्न करू.'

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. तर उर्वरीत कुठल्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. चेन्नईला २० षटक अखेर ७ गडी बाद १६२ धावा करता आल्या.

पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टोने ४६ धावांची खेळी केली. तर रुसोने ४३ धावा केल्या. हा सामना पंजाबने ७ गडी राखून आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: लातूरच्या अहमदपूरमधून जाणाऱ्या मन्याड नदीला पूर

Pune Accident: गणपतीच्या बुकिंगसाठी गेले असता भयंकर घडलं, ट्रकने ११ वर्षांच्या मुलीला चिरडलं; अपघाताचा थरारक VIDEO

Pune : पुण्यातील शाळेत अश्लील डान्स, अंगविक्षेप करत तरुणीनं लगावले ठुमके, Video Viral

Election Commission : आयोगाला पत्रकार परिषद भोवणार? व्होट चोरीचा मुद्दा महाभियोगापर्यंत जाणार?

Maharashtra Government: शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज: बळीराजासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT