आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. इथून पुढे सर्वच सामने सर्वत संघांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण जवळपास सर्वच संघांना प्लेऑफमध्ये जाण्याची समान संधी आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जचा संघ देखील प्लेऑफच्या शर्यतीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचा असणार आहे.
अशी असेल चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेइंग ११...
हा चेन्नई सुपर किंग्ज संघातील गोलंदाज मुस्तफिजूर रहमानसाठी शेवटचा सामना असणार आहे. हा सामना झाल्यानंतर तो मायदेशी परतणार आहे. त्यामुळे या सामन्यात तरी चेन्नईच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे.
तर पंजाब किंग्ज संघाबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात शिखर धवनचं कमबॅक होऊ शकतं. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिखर धवन संघात आल्यास तो सलामीला येईल. त्यामुळे सलामी जोडी बदलू शकते.
या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११... (CSK vs PBKS Playing XI prediction)
चेन्नई सुपर किंग्ज- अंजिक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोइन अली, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिपक चाहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजूर रहमान, मथिशा पथिराना
इम्पॅक्ट प्लेअर - शार्दुल ठाकुर.
पंजाब किंग्ज- प्रभसिमरन सिंग,जॉनी बेअरस्टो, राइली रुसो , जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करन (कर्णधार), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत बराड, हर्षल पटेल,कगिसो रबाडा, हरप्रीत सिंग
इम्पॅक्ट प्लेअर- अर्शदीप सिंग
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.