ruturaj gaikwad statement after defeat against lucknow super giants in csk vs lsg match amd2000
ruturaj gaikwad statement after defeat against lucknow super giants in csk vs lsg match amd2000twitter

Ruturaj Gaikwad Statement: 'विश्वासच बसत नाहीये..' पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार ऋतराज गायकवाड?

Ruturaj Gaikwad, CSK vs LSG: आयपीएल २०२४ स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

आयपीएल २०२४ स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने २१० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मार्कस स्टोइनिसने शानदार खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा पराभव का झाला? याबाबत कर्णधार ऋतुराज गायकवाडने भाष्य केलं आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितलं की, चेन्नईचा संघ १३-१४ व्या षटकापर्यंत सामन्यात टिकून होता. मात्र त्यानंतर मार्कस स्टोइनिसने शानदार खेळी करत सामना हिसकावून घेतला.

या सामन्यानंतर बोलताना ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ' विश्वासच होत नाहीये. मात्र हा एक रोमांचक सामना होता. १३-१४ व्या षटकापर्यंत सामना आमच्या मुठीत होता. मात्र त्यानंतर लखनऊने शानदार खेळ केला. मैदानावर दवाचं प्रमाण वाढलं होतं. त्यामुळे आम्ही सामन्यातून बाहेर फेकलो गेलो. फिरकी गोलंदाज काहीच करू शकत नव्हते. आम्ही सामना अजून खेचू शकलो असतो. मात्र हा एक खेळाचा भाग आहे.'

ruturaj gaikwad statement after defeat against lucknow super giants in csk vs lsg match amd2000
IPL 2024 : सुनील नारायणचा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का; म्हणाला, ते दरवाजे आता बंद झालेत!

तसेच तो पुढे म्हणाला की, 'पावरप्लेमध्ये जड्डू चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. आम्ही आधीच ठरवलं होतं, जर पावरप्लेच्या नंतर विकेट गेला तर शिवम दुबे फलंदाजीला येईल. आम्ही फलंदाजांना बाद होण्यासाठी फोर्स करू शकत नाही. खरं सांगू तर आम्ही पुरेशा धावा केल्या होत्या. मात्र लखनऊच्या फलंदाजांना श्रेय द्यावं लागेल.'

ruturaj gaikwad statement after defeat against lucknow super giants in csk vs lsg match amd2000
Yuzvendra Chahal: फक्त IPL च नाही, तर टीम इंडियाकडूनही घेतल्यात सर्वात जास्त T20 विकेट्, पण खेळला नाही एकही WC मॅच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com