Ruturaj Gaikwad- Utkarsha Pawar: उत्कर्षाच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाडची तुफान फटकेबाजी; Video तुफान व्हायरल

IPL 2024: आतंरराष्ट्रीय गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या ऋतुराजला त्याची पत्नी उत्कर्षाने ओपन चॅलेंज दिलं. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
utkarsha pawar challenged ruturaj gaikwad on cricket field video viral amd2000
utkarsha pawar challenged ruturaj gaikwad on cricket field video viral amd2000twitter

आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाची जबाबदारी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे. या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच एमएस धोनीने कर्णधारपदावरुन माघार घेतली. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये त्याने नेतृत्वाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आहे. यासह फलंदाजीतही त्याने शानदार कामगिरी करुन दाखवली आहे. दरम्यान आतंरराष्ट्रीय गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या ऋतुराजला (Ruturaj gaikwad) त्याची पत्नी उत्कर्षाने (Utkarsha Pawar)ओपन चॅलेंज दिलं. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये उत्कर्षा ऋतुराजला चॅलेंज देताना दिसून येत आहे. ऋतुराज तिला म्हणतो की, मी तुझ्या गोलंदाजीवर ३६ धावा करेल. त्यावर ती म्हणते की, ६ चेंडूंमध्ये १० धावा करुन दाखव. त्यानंतर दोघांमध्ये क्रिकेटचा सामना रंगतो.

utkarsha pawar challenged ruturaj gaikwad on cricket field video viral amd2000
PBKS vs MI, IPL 2024: बुमराह रॉक्स, रुसो शॉक! भन्नाट यॉर्कर चेंडू टाकून आडवाच पाडला; Video

उत्कर्षा प्रोफेशनल गोलंदाज आहे. ती नेट्समध्ये शानदार गोलंदाजी करताना दिसतेय. तर ऋतुराज गायकवाड देखील तुफान फटकेबाजी करताना दिसून येतोय. यादरम्यान उत्कर्षा यॉर्कर चेंडू टाकते ज्यावर ऋतुराज क्लिन बोल्ड होणार होता. शेवटी ऋतुराज ही चॅलेंज जिंकतो.

उत्कर्षा ही महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळते. ती एक उत्तम गोलंदाज आहे. ३ जून २०२३ रोजी दोघेही विवाह बंधनात अडकले होते. तर ऋतुराज गायकवाडबद्दल बोलायचं झालं तर, आयपीएल २०२४ स्पर्धेत तो शानदार फॉर्ममध्ये असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये त्याने २२४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ अर्धशतकं देखील झळकावली आहेत. मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने संघाला शानदार सुरुवात करुन दिली होती. या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली.

utkarsha pawar challenged ruturaj gaikwad on cricket field video viral amd2000
IPL 2024: पर्पल कॅपच्या यादीत बुमराह नंबर १! ऑरेंज कॅपसाठी विराटला या फलंदाजांकडून कडवी झुंज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com