IPL 2024 : सुनील नारायणचा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का; म्हणाला, ते दरवाजे आता बंद झालेत!

Sunil Narine : वेस्टइंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याच्या चर्चेचं क्रिकेट विश्वात उठलेलं वादळ त्याच्या एका उत्तरानं शांत झालंय.
IPL 2024 : सुनील नारायणचा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का; म्हणाला, ते दरवाजे आता बंद झालेत!
Sunil NarineSAAM TV
Published On

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मैदानात धावांचा पाऊस पाडून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा सुनील नारायण यानं त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. वेस्टइंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याच्या चर्चेचं क्रिकेट विश्वात उठलेलं वादळ त्याच्या एका उत्तरानं शांत झालंय. आता दरवाजे कायमचे बंद झाले आहेत, असं त्यानं स्पष्ट आणि तितकंच नम्रपणे नमूद केलंय.

सुनील नारायण हा सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत आहे. यंदाच्या स्पर्धेत त्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. भल्याभल्या गोलंदाजांना आपल्या बॅटनं त्याच्यासमोर लोळण घालायला लावली आहे. दुसरीकडे या अष्टपैलू खेळाडूनं गोलंदाजीतही कमाल केली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना तो फिरकीवरही नाचवतोय. नारायण केकेआर संघासाठी अतिमहत्वाचा खेळाडू ठरलेला आहे.

आयपीएलमध्ये धावांचा रतीब घालणारा ३५ वर्षीय सुनील नारायण आगामी टी-२० वर्ल्डकप संघात खेळू शकतो, असं चर्चेचं वादळ क्रिकेटविश्वात घोंघावतंय. त्याचवेळी ही शक्यता स्वतः नारायणनं फेटाळून लावली आहे. तो आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्मात आहे. तरीही त्यानं टी २० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीजकडून खेळणार नाही, असं सांगून टाकलंय. आता दरवाजे बंद झाले आहेत, असं तो म्हणाला.

सुनील नारायण काय म्हणाला?

नारायण सध्या फॉर्मात आहे. मागील वर्षभरापासून आपण नारायणच्या वापसीबाबत बोलत आहोत, असं वेस्ट इंडीजच्या टी २० संघाचा कर्णधार रोवमन पॉवेल यानंही म्हटलं होतं. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध शतक झळकावल्यानंतरही नारायणनं या शक्यता फेटाळल्या नव्हत्या. मात्र, नुकतंच एका निवेदनाद्वारे यावर प्रतिक्रिया दिली आहे. मला याचा आनंद आहे. मी फॉर्मात असल्यानं निवृत्ती मागे घेऊन आगामी टी २० वर्ल्डकपमध्ये खेळावं अशी लोकांची इच्छा आहे. त्यांचा मी आभारी आहे. पण मी निवृत्तीचा निर्णय घेतला होता. आता माझ्यासाठी ते दरवाजे बंद झाले आहेत, असं नारायणनं त्यात नमूद केलंय.

IPL 2024 : सुनील नारायणचा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का; म्हणाला, ते दरवाजे आता बंद झालेत!
Ambati Rayudu Statement: 'मुंबई इंडियन्सकडून खेळाल तर डोकेदुखी वाढणारच..' रायुडूचं धक्कादायक वक्तव्य

ज्यांनी राष्ट्रीय संघात येण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून कठोर मेहनत केली आहे, अशा वेस्टइंडीजचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना माझा पाठिंबा आहे. हे खेळाडू आणखी एक टी २० वर्ल्डकप जेतेपद पटकावून देतील. मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो, असंही त्यानं म्हटलं आहे.

सुनील नारायणची आतापर्यंत कामगिरी

सुनील नारायणनं आतापर्यंत केकेआरकडून सात सामने खेळले आहेत. त्यात त्यानं ४० च्या सरासरीनं आणि १७६.५४ च्या स्ट्राइक रेटनं २८६ धावा कुटल्या आहेत. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. राजस्थानविरुद्ध त्यानं सर्वाधिक १०९ धावा केल्या होत्या. एकूण २८ चौकार आणि २० षटकार त्यानं ठोकले आहेत. गोलंदाजीतही त्यानं कमाल केली आहे. सात सामन्यांत त्यानं ९ फलंदाजांना गारद केलं आहे.

IPL 2024 : सुनील नारायणचा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का; म्हणाला, ते दरवाजे आता बंद झालेत!
Yuzvendra Chahal: फक्त IPL च नाही, तर टीम इंडियाकडूनही घेतल्यात सर्वात जास्त T20 विकेट्, पण खेळला नाही एकही WC मॅच

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com