rr vs rcb x
Sports

RR VS RCB : यशस्वी जयस्वाल एकटा लढला, ध्रुव जुरेलच्या फिनिशिंग टचने राजस्थानला थोडासा आधार दिला

RR VS RCB Match Updates : सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत राजस्थानच्या संघाने २० ओव्हर्समध्ये १७३ धावा केल्या.

Yash Shirke

RR VS RCB IPL 2025 : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा आयपीएल २०२५ मधला सामना रंगला आहे. या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरले. २० ओव्हर्समध्ये राजस्थानच्या संघाने १७३ धावा केल्या.

राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन सलामीला आहे. संजू सॅमसन लवकर बाद होऊन माघारी परतला. त्याने १५ धावा केल्या. त्याने संथगतीने फलंदाजी केली. रियान पराग ३० धावा करुन बाद झाला. आक्रमक खेळी करणारा शिमरॉन हेटमायर फक्त ९ धावा करुन परतला. यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ७५ धावा केल्या. ध्रुव जुरेलने ३५ धावा केल्या.

दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जॉश हेजरवुड आणि कृणाल पंड्या या चार गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. सुयश शर्माने सर्वात जास्त ३९ धावा दिल्या. राजस्थान रॉयल्सने १७३ धावा केल्या आहेत. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजयासाठी १७४ धावा कराव्या लागणार आहेत.

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग ११ :

यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महिश तिक्षणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग ११ :

फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, यश दयाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT