पालघर: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कांदरवाडी येथील सूर्यानगर आश्रम शाळेच्या वस्तीगृहाला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीमध्ये वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचे कपडे, शैक्षणिक साहित्य, गाद्या तसेच इतर दैनंदिन वापराच्या वस्तू जळून खाक झाल्या. या वस्तीगृहात 200 पेक्षा अधिक विद्यार्थी वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.
सुदैवाने ही दुर्घटना वेळेत लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. विद्यार्थ्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात मदत करत बचावकार्याला हातभार लावला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आगीमागील नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.